Breaking
शासकीय

‘समाज कल्याण’च्या शासकीय वसतिगृह प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर

0 3 2 1 2 3

नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहांचे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेशाबाबतचे सुधारीत वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशााठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन नाशिकच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जुने) चे गृहपाल यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

10 जुलै 2024 पर्यंत वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर केलेल्या शालेय विद्यार्थ्यांची 12 जुलै 2024 रोजी पहिली निवड यादी अंतिम करून प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना 18 जुलै 2024 पर्यंत प्रवेश घेता येईल. यातून रिक्त राहणाऱ्या जागांवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी ही 19 जुलै 2024 रेाजी प्रसिद्धी होईल व या यादीनुसार 24 जुलै 2024 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

इयत्ता 10 वी व 11वी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी तसेच 12 नंतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतेलेले विद्यार्थी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) यांनी वसतिगृह प्रवेशासाठी 31 जुलै 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. या विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट 2024 रोजी पहिली निवड यादी अंतिम करून प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवेश घेता येईल. यातून रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी ही 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धी होईल व या यादीनुसार 22 ऑगस्ट 2024 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास मुदत संपल्यानंतर अर्ज स्वीकारले जातील व पुढील प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे दोन निवड यादी जाहीर करण्यात येतील. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीचे वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे