Breaking
गुन्हेगारी

स्टेट बँकेतून शेतकऱ्याची दीड लाख रुपये चोरी

स्लिप भरत असताना पिशवीतून रक्कम गायब

0 3 2 1 2 4

लक्ष्मण घुगे, राजापूर…

भारतीय स्टेट बँकेच्या येवला शाखेतून १ लाख ४९ हजार रुपये शेती कामासाठी काढून त्यातील काही रक्कम आईच्या खात्यात भरण्यासाठी स्लिप भरत असतानाच अज्ञात चोरट्यांनी या पैशावर डल्ला मारला.

या बाबत येवला शहर पोलीसात शुभम दत्तात्रय खोडके या शेतकरी युवकाने तक्रार दाखल केली असून, तक्रारीत म्हटले आहे की, आपण स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा येवला येथील बचत खात्यातून शेतीकामासाठी काही रक्कमेची गरज असल्याने दि. ११ शोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान कॅश काऊंटरला चेक देवुन रक्कम रुपये १,४९,000/ – अक्षरी रुपये एक लाख एकोनपन्नास हजार मात्र इतकी रक्कम काढली. त्यानंतर या रक्कमेतुन काही रक्कम आईचे नांवे असलेल्या बँक खात्यात वर्ग करायची असल्याने काढलेली रक्कम त्यांचे जवळ असलेल्या बॅंग मध्ये ठेबुन तेथुन स्लीप धेबुन ती भरु लागला. त्यानंतर भरलेली स्लीप व पैसे कॅश काऊंटरला जमा करण्यासाठी जाण्यासाठी बॅगेत पैसे काढण्यासाठी हात टाकला असता बॅगेत पैसे नसल्याचे दिसुन आले. यावेळी बँकेत पैसे शोधण्याचा बराच प्रयत्ल केला. परंतु अज्ञात चोरट्यांनी रक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला होता. तक्रारदार शेतकरी युवक शुभम याने येवला पोलिसात तक्रार दाखल केली असून रक्कम शोधून देण्याची विनंती केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

बँकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामानिमित्त बँकेत महिलांची दररोज गर्दी असते. तक्रादर युवकाने पैसे भरण्यासाठी रांगेत उभा असताना त्याच्या मागे दोन महिलां रांगेत उभ्या राहिल्या. पैकी एकीने कुणाला दिसू नये यासाठी त्याला कव्हर केले, तर दुसरीने बॅगची चैन उघडून अलगद पैसे काढले असल्याचा संशय आहे. महिलांची गर्दी असल्याने संशयित हालचाली दिसल्या नाहीत.
– : शरद गिलबिले, शाखाधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया, येवला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे