Breaking
शासकीय

निफाड तहसील कार्यालयात महसूल पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात

0 4 2 9 5 8

शरद लोहकरे, लासलगाव…

शासनाच्या अधिसूचनेनुसार १ ऑगस्ट रोजी महसूल दिन दरवर्षी साजरा केला जातो,त्यानिमित्ताने ”महसूल पंधरवाडा” ची सुरुवात तहसील कार्यालय निफाड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेसाठी विशेष कार्यान्वित करण्यात आलेल्या वॉर रूम चे उदघाटन आ. दिलीपराव बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी उपविभागीय अधिकारी निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षातील शासकीय कामाचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकात सादर केला. नायब तहसीलदार श्रीमती दीपाली खेडेकर यांनी महसूल पंधरवाडा मध्ये साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.यावेळी आ. दिलीपराव बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण च्या वचनचिठ्ठीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निफाड विधानसभा मतदार संघांचे सदस्य आ.दिलीपराव बनकर होते. उपस्थित मान्यवरांमध्ये तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका कृषी अधिकारी श्री सुधाकर पवार, निवासी नायब तहसीलदार श्रीमती दिपाली खेडेकर , संगायो नायब तहसीलदार श्री सुनील भावसार, निवडणूक नायब तहसीलदार श्री राहुल मुळीक , बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आरती गांगुर्डे, महिला व बाल विकास अधिकारी- पिंपळगाव बसवंत श्रीम कविता पाटील, उपनिबंधक श्रीम दिपाली जगताप मॅडम उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयास सुसज्ज कार्यालयीन इमारतही उपलब्ध करून दिल्याबद्दल तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने आ.बनकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी प्रसाद देशमुख यांनी केले.

महसूल विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि विविध प्रकारच्या योजनांची राज्यातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेला माहिती प्राप्त व्हावी व त्यांना सुलभ रीतीने योजनांचा लाभ घेता यावा, तसेच शासकीय कामाबाबत नागरिकांचा विश्वास वाढावा, या उद्देशाने लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन मागील वर्षापासून महसूल दिनाला महसूल सप्ताहाचे आयोजन करण्याचा सुंदर निर्णय शासनाने घेतलेला असून यावर्षी सुद्धा “महसूल पंधरवाडा-२०२४” साजरा करण्यात येणार असून यासाठी अधिकारी वर्गाने जास्तीत जास्त सहकार्य करावे व सेवा उपलब्ध करून द्यावी.महसूल विभागाच्या कामाचे कौतुक करताना फक्त महसूल पंधरवाडा म्हणूनच नव्हे तर येणाऱ्या काळात ही सर्व सामान्य नागरिकांची कामे तत्परतेने करावीत अशा सूचना यावेळी दिल्या.

– मा.आ. दिलीपराव बनकर
विधानसभा सदस्य, निफाड

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे