Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रसामाजिक

“स्री और समय” पुस्तक व ” दुनिया मेरी उडान देखेगी” चित्रपटाचा पोस्टर प्रकाशन सोहळा नाशिकमध्ये पार पडला

0 4 2 9 5 8

“स्री और समय” पुस्तक व ” दुनिया मेरी उडान देखेगी” चित्रपटाचा पोस्टर प्रकाशन सोहळा नाशिकमध्ये पार पडला

समाजात दुर्दैवाने अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या हुंडा बळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरपराध, संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत, यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित ” स्त्री और समय “ या आशयघन नाटकावरील पुस्तकाचा आणि ” दुनिया मेरी उडान देखेगी” या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक ७ जुलै २०२५ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर सभागृहात सायंकाळी ४.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.

मीनाक्षी निर्मला, जीतू शिंदे यांच्या सोबत मेसर्स पद्मश्री बिल्डर्स पराग अहिरे, प्रमुख पाहुणे म्हणून कल्किराम महाराज, दिलीप दळवी, जयराज नायर, पराग अहिरे, गणेश जाधव, निखिल पवार, या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लेखिका मिनाक्षी निर्मला यांच्या ” स्त्री और समय “ या नाटकावरील पुस्तकाला विजया जीवन यांची प्रस्तावना आहे. एका सधन कुटुंबातील अतिशय संवेदनशील ममता या विवाहितेचा तिच्या सासरच्यांकडून तिने आपल्या माहेराहून जमीन व भरपूर पैसे वगैरे आणावे यासाठी छळ केला जात असतो. तिचा पती केशव या प्रकरणात हतबल असतो. तिचा भाऊ रघु आपल्या या दुर्दैवी बहिणीला साथ देतो. समाजातील हुंडा बळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला चहूबाजूने प्रतिकार करणे आवश्यक आहे हेच ” स्त्री और समय ” या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशक पुणे येथील संवेदना प्रकाशन आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे