आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्रसामाजिक
किम्स मानवता हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमला सुरवात
0
4
2
9
5
7
किम्स मानवता हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमला सुरवात
प्रतिनिधी : किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे आज डॉक्टर्स डे आणि किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रॅम या दोन्ही खास प्रसंगानिमित्ताने एक भव्य कार्यक्रम पार पडला. यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला, तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित डॉक्टर, ट्रान्सप्लांट रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय हे या प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार ठरले.
“किडनी ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमचे प्रभावी मार्गदर्शन डॉ. मोहन पटेल (किडनी प्रत्यारोपण तज्ञ) यांनी केले. त्यांनी ट्रान्सप्लांट युनिटच्या यशस्वी केसेसचा आढावा घेतला आणि या उपचारांमुळे रुग्णांच्या आयुष्यात घडलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने त्यांनी किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी विशेष ‘किडनी ट्रान्सप्लांट पॅकेज’ जाहीर केले. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, कार्यक्रमादरम्यान २५ रुग्णांनी हे विशेष पॅकेज घेण्यासाठी नोंदणी केली. तसेच अधिक माहितीसाठी रुग्णांनी किम्स मानवता हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केल.
किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नागरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये आमचा विश्वास आहे की, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, कुशल डॉक्टर आणि सहानुभूतीपूर्वक सेवा या त्रिसूत्रीवर आरोग्यसेवा उभी आहे. किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी होणं ही केवळ वैद्यकीय कामगिरी नसून, ते मानवतेचं दर्शन आहे.
सीओओ डॉ. निलेश सिंग यांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले, किडनी ट्रान्सप्लांट हा रुग्णासाठी नवीन आयुष्याची सुरुवात असते. आमची संपूर्ण टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते आणि यशस्वी किडनी ट्रान्सप्लांट हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे. भविष्यात आणखी अधिक ट्रान्सप्लांटसाठी आम्ही सज्ज आहोत.
कार्यक्रमात यशस्वी ट्रान्सप्लांट रुग्णांनी आपल्या अनुभवांची मांडणी केली, त्यात एक रुग्ण म्हणाले, पूर्वी मी डायलिसिसवर होते, चालता बोलता येत नव्हतं. आज मी पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभी आहे. हे केवळ डॉक्टरांमुळे शक्य झालं.
किम्स मानवता हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल असून, उन्नत किडनी ट्रान्सप्लांट सेवा, आधुनिक ICU सुविधा आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे.

डॉ. राज नागरकर, व्यवस्थापकीय संचालक, डॉ.मोहन पटेल किडनी प्रत्यारोपण तज्ञ, डॉ. निलेश सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), किम्स मनवता हॉस्पिटल, नाशिक
0
4
2
9
5
7



