Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

मानवस्पर्श संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0 4 2 9 5 7

मानवस्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लासलगाव स्टेशन येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

मानवस्पर्श सेवाभावी संस्था, लासलगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लासलगाव स्टेशन शाळेतील इ.०१ ली ते इ. ०४ थी या वर्गातील ७३ विद्यार्थ्यांना हासुरे इंग्रजी प्रायमर, सचित्र बालमित्र मराठी अंकलीपी ,मिक्स वही, स्केचपेन, पेन्सिल, खोडरबर इ. शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

संस्थेने २०१६ पासून “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले असून शहिद जवान कुटुंब, समाजातील गरीब, दिव्यांग, गरजू व्यक्ती, दिपावली फराळ वाटप, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्य, कोरोनाग्रस्त रुग्ण, अमरधाम स्वच्छ्ता व दीपोत्सव , वयोवृद्ध निराधार दांपत्य,ऊसतोडणी कामगार यांना मदत करण्यात आली आहे .मानवाला दुःखातून सावरण्यासाठी आधार देण्याचे कार्य संस्थेच्या वतीने अविरतपणे सुरू आहे. संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी संस्थेला राजमाता अहिल्यादेवी राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आजपर्यंत संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२१ पासून २९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा.सुनिल देवढे सर यांनी केले. त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांची व संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त प्रा. अरुण देवढे सर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधव कुंभार्डे (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) यांनी भूषविले त्यांनी संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देवून संस्थेच्या कार्यामुळे गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊन विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील असे विचार मांडले.

शाळेचे उपक्रमशील शिक्षक सचिन शेलार सर यांनी संस्थेच्या शालेय शैक्षणिक साहित्य वाटप हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे असे विचार मांडले . संस्थेचे अध्यक्ष केशव जाधव,उपाध्यक्ष योगेश न्याहरकर ,सचिव प्रा.सुनिल देवढे सर,खजिनदार सूर्यकांत जाधव, विश्वस्त प्रा.अरुण देवढे सर , सभासद कल्पना परब मॅडम, शाळेच्या माजी विद्यार्थिनी हेमलता चव्हाण मॅडम हे मान्यवर उपस्थित होते.

    या उपक्रमासाठी अनंत सोमवंशी (अमेरिका), ज्ञानेश्वर शिंदे (पुणे), कार्याध्यक्ष अँड.सुनिल वाघचौरे विश्वस्त समीर देवढे,ज्ञानेश्वर देवढे, सुरेखा देवढे, सोपान जाधव, सभासद गोरख देवढे सर, प्रताप आढाव सर,सचिन शेलार सर, नवनाथ कोकणे, कल्पना परब मॅडम,गणेश महाले सर, हेमलता चव्हाण मॅडम यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका बधान म्याडम यांनी केले . तर आभार प्रदर्शन खैरे म्याडम यांनी केले.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे