
0
3
2
1
2
4
मनमाड, इंदूर-पुणे महामार्गावर दोन्ही बाजूचे गतिरोधक व डिव्हायडरची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
✍️ मुक्ताराम बागुल…
नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील दोन्ही बाजूचे गतिरोधक स्पीड ब्रेकर व डिव्हायडर काढून टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तात्काळ दोन्ही बाजूचे गतिरोधक (डिव्हाइडर) करण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड यांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दाट वस्ती असलेली वसाहत असून या ठिकाणापासून सतत नागरिकांची येजा सुरू असते. तसेच दुचाकीसह इतर वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. समोरून मालेगाव व शिर्डी कडे जाणारी लहान व मोठे वाहन सुसाट धावत असतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेली नागरिक अचानक या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी देखील या ठिकाणी अनेक अपघात होऊन नागरिकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तर काहींना जीव गमावा लागलेला आहे. तरी सदरच्या समस्येचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोर वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी या ठिकाणी डाव्या व उजव्या बाजूस रस्त्यावर गतिरोधकाची फार आवश्यकता आहे. तसेच रस्त्यामधील डीवाईडर नामशेष झालेले असून वाहने आडवे तिडवे घुसतात त्यामुळे देखील अपघात मोठ्या प्रमाणात होतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो. करिता सदर बाबत गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी अन्यथा व्यापक जनहित लक्षात घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाची आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा उपाभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. सदरचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग मनमाड, शहर पोलीस निरीक्षक मनमाड यांना निवेदन देण्यात आले आहे
या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, मोहन गायकवाड, बॉबी पवार, भैय्या भालेराव, आकाश निकम भैय्या निकम, निखिल शिंदे, रोहन पुहारे, अतीस पांडे, काकासाहेब शिंदे, सतीश पवार, लखन गरुड, बाळाभाऊ अहिरे, भैरव सोनवणे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0
3
2
1
2
4