Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

‘मना’चे श्लोक’ चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

0 4 2 9 5 7

कुटुंब, प्रेम आणि मैत्रीची रंगतदार कहाणी
‘मना’चे श्लोक’ चा धमाल ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

टीझर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेला ‘मना’चे श्लोक’ आता ट्रेलरमुळे आणखीच रंगला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची मजेदार धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहात आहे. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार, ते दोघं एकत्र येतील का, लग्नासाठी तयार होतील का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणतात, “हा फक्त श्लोक-मनवाचा प्रवास नाही तर त्यांच्या कुटुंबांचाही आहे. यात नाती, प्रेम, मैत्री आणि मजाही आहे. प्रेक्षकांना हे सगळं आपलं वाटेल आणि ते रंगून जातील.”

प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य म्हणतात, “ही आजच्या काळातील प्रेमकथा आहे, तरीही त्यात कुटुंबाची चौकटही आहे. ट्रेलरमुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि उत्तरं लवकरच चित्रपटात मिळतील.”

निर्माते संजय दावरा म्हणतात, “यातील प्रसंग सगळ्यांच्या घरात घडतात. घरातील छोट्या छोट्या गंमती, अनपेक्षित वळणं आणि त्यातून उलगडणारी मजेशीर कथा प्रेक्षकांना नक्कीच आपलीशी वाटेल.”

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसतील.

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून याचे लेखन-दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे