Breaking
सत्कारसामाजिक

निफाडला माणुसकी फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

0 4 2 9 5 7

निफाड प्रतिनिधी-
वनसगांवचे भुमिपुञ मराठा विध्याप्रसारक समाजाचे माजी सेवानिवृत्त मुख्खाध्यापक पी. एस निकाळे सर यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने माणुसकी फाऊंडेशन निफाड चे संस्थापक अध्यक्ष सागर निकाळे ह्यांनी शिक्षण क्षेञातील आदर्श ,कत्तृत्ववान तसेच सामाजिक बांधिलकी जपत आपले सर्वस्व विद्यार्थ्यांना घडववण्यासाठी सतत प्रयोगशिल,प्रयत्नशिल असणाऱ्या गुरुजणांचा सन्मान सोहळा निफाङ येथे आयोजित केला होता.सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते मा.बी जी शेखर माजी विशेष महानिरिक्षक नाशिक पोलिस परिक्षेञ विभाग हे होते.कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या व्याख्यानातुन त्यांनी आपले अमुल्य विचार मांडले.गुरु हा राष्ट्राच्या जडण घडणीमध्ये महत्त्वाची भुमिका बजावतो..गुरू हा प्रत्येक गोष्टीचा दुरदृष्टीकोन ठेवून आपले विचार विद्यार्थ्यांना प्रदान करत असतो.छञपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ ह्या गूरु म्हणुन लाभल्या.अफजलखान वधाच्या वेळी घातपाताची शक्यता आहेच आणि त्याची पुर्ण खबरदारी घेतली पाहिजे त्यासाठीच्या उपाययोजनांचा सल्ला माता जिजाऊंनी च महाराजांना दिला होता.अशा अनेक प्रसंगात अमुल्य असे विचार महाराजांच्या जिवनात माता जिजाऊंनी दिले त्यामुळेच स्वराज्य निर्माण झाले.सद्धस्थितीला आपल्या कडुन होणाऱ्या कृतीशिल तसेच आदर्श कार्यामुळे ,ज्ञानदानामुळे भावी पिढी हि आदर्श नागरिकांची पिढी असेल ह्यात शंकाच नाही.म्हणुन तुम्हां सर्वांचा गौरव होत आहे ह्यासारखा दुसरा आनंद नाही..अशे अनेक विचार त्यांनी आपल्या व्याख्यानातुन व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते शिवाजीराव ढेपले होते तर प्रमुख अतिथी म्हणुन लासलगाव मार्कट कमेटीचे सभापती ङी.के.जगताप .ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली.शिक्षक नेते संजय चव्हाण.जेष्ठ नेते भाऊसाहेब बोचरे.शंकर कोल्हे,दत्ता रायते.अँङ शेखर देसाई.रिपाईचे सागर गायकवाङ.धारणगांव चे पोलीस पाटील राहुल सोनवने.पांङुरंग कर्ङीले,सुरेश धारराव.माणीक कुशारे.संपत रोटे.नामदेव गायकवाङ. गायञी लचके.पुनम टापसे.देवयानी आहेर.जयश्री बस्ते ठाकरे सर आदी मान्यवर उपस्थितीत होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे