Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिक

‘कर्मवीरांचे शिक्षण हे सक्षम शिक्षण’ – न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८वी जयंती साजरी

0 4 2 9 3 8

विंचूर,29 सप्टेंबर 2025 :

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण होते.
सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण, उत्तर विभागीय सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, जगदिश जेऊघाले, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी सर्वांचे स्वागत केले तर उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे यांनी शाळेचा प्रगती सविस्तर अहवाल सादर केला.

मुख्य पाहुणे न्यायाधीश रामकृष्ण चव्हाण यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांसाठी सुरू केलेल्या शिक्षणयात्रेचा लाभ घेऊन माझ्यासारखे हजारो विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेमार्फत दिले जाणारे शिक्षण हे सर्वोत्तम व जागतिक स्पर्धेत टिकून राहणारे सक्षम शिक्षण आहे. यशस्वी होण्यासाठी कोणताच शॉर्टकट नाही. परिस्थिती कितीही खडतर असली, तरी ती कारण न बनवता साधन बनवावी.” त्यांनी विद्यार्थ्यांना अशाच प्रेरणादायी संदेशाने मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदिश जेऊघाले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मोठे होण्याचा आवाहन केले. पी. के. जेऊघाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ गोरे, रंजीत गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांना उपदेश केले.

या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोमनाथ निकम, मधुकर दरेकर, सतीश शेलार, ज्ञानेश्वर गाडे, किशोर दरेकर, कुमार चव्हाण, विंचूर प्रेस क्लब चे पत्रकार किशोर पाटील,  डी बी कादरी, जगन्नाथ जोशी, नितीन गायकवाड, संदिप शिरसाट, भाऊसाहेब हुजबंद, दत्तात्रय दरेकर, तसेच साहेबराव ठुबे, अशोक दरेकर, नारायण घायाळ, प्रदिप काशीकर, सुमन दरेकर, वर्षा वाघ,प्रियंका गोरडे, मीरा दरेकर, आबासाहेब दरेकर, विश्वनाथ उशीर, अरुणा राऊत, राजू क्षीरसागर, संदीप जोशी, आत्माराम दरेकर,अभय पाटील, अशपाक शहा, पंकज डोखे, आहेर सर, ढवण सर, गुजर सर, सोनाली कापडणीस, मालती जाधव, वसंत गुजर, विंचूर व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाट, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे लाइफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा व सावळे मॅडम यांनी केले, आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदामराव माळी यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे