Breaking
क्रिडा व मनोरंजन

गौरव दुबे, गौरव मोरे आणि हेमांगी कवी यांनी सादर केला एक धमाल अॅक्ट ‘फिरंगी की धडकन’!

0 3 2 1 2 3

‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव दुबे, गौरव मोरे आणि हेमांगी कवी यांनी सादर केला एक धमाल अॅक्ट ‘फिरंगी की धडकन’!

या रविवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील, ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ या विनोदी शो मधील गौरव मोरे, गौरव दुबे आणि हेमांगी कवी हे डायनॅमिक त्रिकूट, ‘फिरंगी की धडकन’ या खळखळून हसवणार्‍या अॅक्टसाठी एकत्र येईल. गौरव मोरे, मोहक देवच्या रुपात दिसेल, गौरव दुबे ‘द अंग्रेजी बाप’ म्हणून हशा पिकवेल आणि हेमांगी कवी अत्याधुनिक अँजेलिना साकार करेल. देव अँजेलिनावरील आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी लंडनला जातो, परंतु ‘द अंग्रेजी बाप’- तिच्या वडीलांचा त्यांच्या लग्नाला ठाम विरोध आहे. इथे प्लॉटमधला गोंधळ वाढतो. एक मजेशीर कलाटणी म्हणजे, द अंग्रेजी बाप देवला अँजेलिनाचे मन जिंकण्यासाठी पैसे कमावण्याचे आव्हान देतो आणि त्याला एक रिकामी बॅग देतो, नंतर लक्षात येते की त्याने चुकून त्याला रोख रक्कम असलेली बॅगच दिलेली असते!

या परफॉर्मन्सबद्दल सांगताना गौरव दुबे म्हणतो, “आमच्या आगामी गॅगसाठी ‘द अंग्रेजी बाप’ साकारताना मला खूपच धमाल आली कारण त्यात मला स्वतःची शैली आणि लकब वापरण्याची मुभा मिळाली. या अॅक्टसाठी गौरव मोरे आणि हेमांगी कवी यांच्यासोबत एकत्र काम करणे म्हणजे तर सोन्याहून पिवळे! सेटवर खूपच धमाल यायची आणि आमच्यातील केमिस्ट्री आणि सामंजस्य आमच्या गॅगमध्ये झळकलेच. आम्ही या परफॉर्मन्समध्ये भरलेली धमाल आणि मजा सगळ्यांनी बघावी यासाठी मी अधीर झालो आहे.”

विनोदवीरांच्या या धम्माल परफॉर्मन्सेसनंतर ‘मॅडनेस की मालकीन’ हुमा कुरेशी त्यांच्यासोबत एक आकर्षक ‘ट्रूथ अँड डेअर’ गेम खेळताना प्रेक्षकांना दिसेल.

अवश्य बघा, ‘मॅडनेस मचाएंगे – इंडिया को हसाएंगे’ या रविवारी रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे