Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पुण्याच्या स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार 

0 3 2 1 2 3

पुण्याच्या स्वारगेट येथे शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार 

पुणे…

स्वारगेट सोलापूर शिवशाही बस मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्याच्या स्वारगेट बस स्टॉप वर घडली.

पिडीत तरुणीने याबाबत घरच्यांना सांगितले असता पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली असून आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत डिसिपी स्मार्तना पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की पिडीत मुलगी ही फलटण ला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर पहाटे आलेली होती यावेळी एक तरुण तिच्या जवळ आला त्याने तिच्याशी गोड बोलून जवळीक साधली. तो म्हणाला मलाही फलटण ला जायचे आहे. ताई फलटण ला जाणारी बस लागलेली आहे आपण त्या बस मध्ये जाऊ असे म्हणून ते शिवशाही बस जवळ आले. यावेळी तरुणीने म्हटले की बस मध्ये अंधार आहे. त्यावर तो म्हणाला की पहाटची वेळ असल्यामुळे प्रवाशी झोपले आहे म्हंणून लाईट बंद आहे. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत ती बस मध्ये चढली तिच्या मागे तरुण देखील बसमध्ये चढला त्याने दरवाजा बंद करून तरुणीवर अत्याचार केला.

 ही घटना घडण्यापूर्वी सदरच्या cctv फुटेज वरून तरुणाची ओळख पटली. दत्तात्रय रामदास गाडे असे या तरुणाचे नाव असून तो शिरूरचा रहिवासी आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत. असे पोलीस अधिकारी पाटील यांनी सांगितले.

 सदर आरोपी फरार असून पोलीस पथकांची नेमणूक करून त्याचा शोध सुरू आहे. पीडित तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान कर्तव्यावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे