
कुणाल दराडे यांच्या उमेदवारीमुळे वाढणार निवडणुकीची रंगत?
येवला लासलगाव विधानसभा मतदार संघात तब्बल चार वेळेस निवडणूक जिंकणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस कडून गुरुवारी दि.24 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदार संघांचे नेतृत्व करतांना केलेली हजारो कोटीची कामे हाच मुद्दा या निवडणुकीत प्रमुख ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना शह देण्यासाठी येवल्यातीलच स्थानिक पातळीवर विविध राजकीय सामाजिक पदे उपभोगलेले ऍड माणिकराव शिंदे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. तथापि त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मागील पराभवाचा बदला घेतील कां याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
असे असतांना गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवून मतदार संघात आपल्या कार्याचा अनोखा ठसा उमठावणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल नरेंद्र दराडे येवला लासलगाव विधानसभा मतदान संघातून निवडणूक लढविण्याबाबत तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोनच दिवस उरले आहे. त्यामुळे या मतदार संघात कशी लढत होईल याबाबत मतदार अनभिन्न आहेत.
तूर्तास एवढेच…
भाऊसाहेब हुजबंद