प्राचार्य नंदकुमार देवढे यांचा कृतिशील मुख्याध्यापक पुरस्काराने गौरव

विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांना रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर उत्तर विभागातर्फे दिला जाणारा मातोश्री शांताबाई कडू स्मृती पारितोषिक संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲड.भगीरथजी शिंदे, रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत व इतर मान्यवरांच्या हस्ते सात्रळ तालुका राहुरी येथील रयत संकुलात प्रदान करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आपल्या भाषणातून कृतिशील मुख्याध्यापक देवढे एन ई यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विंचूर विद्यालयात राबवलेल्या विविध गुणवत्ता पूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला याविषयी अभिनंदन केले व इतर उपस्थित मुख्याध्यापकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे यांनी नंदकुमार देवढे यांचा उल्लेखनीय कार्याचा गौरव व अभिनंदन आपल्या भाषणातून केले. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी, विद्यालयाच्या वतीने डॉक्टर सुजित गुंजाळ, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, सुनील मालपाणी सदस्य सल्लागार समिती उत्तर विभाग अहिल्यानगर, चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, अनिल दरेकर सदस्य स्कूल कमिटी क.भा.विद्यालय विंचूर, उपशिक्षक गाडेकर एस.पी शिंदे एस.डी. इतर सेवक व देवढे परिवार उपस्थित होते.