Breaking
ई-पेपरनिवडसत्कार

लायन्स क्लब तर्फे भूषण निकम यांचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरव

0 4 2 9 5 7

*लायन्स क्लब तर्फे भूषण निकम यांचा ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरव*

कृषी उद्योजकता विस्तार क्षेत्रातून पुरस्कार 

सागर निकाळे निफाङ प्रतिनिधी

*नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध कृषी उद्योजक, बिजनेस कोच, मोटिवेशनल ट्रेनर आणि कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम यांना लायन्स क्लब ऑफ पिंपळगाव बसवंत यांच्या वतीने “एक्सपोर्टर अँड ग्रोवर” विभागात ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.*

हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील देवी इंटरनॅशनल हॉटेल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या *कार्यक्रमाला राजेंद्र कोठावदे* हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय *लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप हिरे, सचिव रविराज पाटील, महेंद्र शेवाळे, ज्ञानेश्वर लांबे* आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

या पुरस्कार सोहळ्यात शेतकरी, डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट अशा विविध विभागांतून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

भूषण निकम यांनी कृषी पदवीनंतर गेली १७ वर्षे कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्य केले आहे. त्यांनी माती-पाणी परीक्षण, शेतमाल डीहायड्रेशन, ट्रेनिंग सेंटर, शेतमाल निर्यात, प्रकाशन, ट्रेडिंग अशा विविध क्षेत्रांत स्वतःचे व्यवसाय उभारले. केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता, त्यांनी राज्यभरात ६०० हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती, हजारो कृषी उद्योजक घडवणे, तसेच ३ लाखांपेक्षा अधिक शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून एक व्यापक कृषी चळवळ उभी केली.

या कार्यक्रमात भूषण निकम यांनी “कृषी उद्योजकता व आरोग्य” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतमाल खाणे ही काळाची गरज आहे, असे सांगून त्यांनी लायन्स क्लबच्या वतीने भविष्यात ‘सेंद्रिय बाजार’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत सकारात्मक मदत करण्याचे आश्वासन दिले.

तसेच, *”आपण आपल्या लहान मुलांना जंक फूड आणि पॅकिंग फूड देतो, त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे महिलांनी आपल्या घरातील आहारावर लक्ष द्यावे, कारण आरोग्य असेल तरच आपले अस्तित्व टिकू शकते,”* असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर ६० हून अधिक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार, १७ पुस्तके, १२०० लेख, शेकडो रेडिओ-टीव्ही कार्यक्रम व वेबिनार आणि विविध सेमिनारद्वारे केलेले मार्गदर्शन त्यांचे कार्य क्षेत्र विस्तृत आहे. नुकतेच राज्यपालांच्या हस्ते कृषी पुरस्कार आणि मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांच्या ‘कॉर्पोरेट शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने त्यांच्या कार्यास मान्यता मिळाली आहे.

या कार्यक्रमात भूषण निकम यांच्या कन्या कु. आराध्या निकम हिने लिहिलेल्या ‘Becoming A Smart Student’ या पुस्तकाचेही अभिनंदन करण्यात आले. अवघ्या वयात लेखनप्रवास सुरू केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

हा पुरस्कार केवळ भूषण निकम यांचेच नव्हे, तर संपूर्ण कृषी उद्योजक क्षेत्राचे यश आहे, असे गौरवोद्गार यावेळी उपस्थित मान्यवरांनी काढले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे