कृषीवार्तादेश-विदेशब्रेकिंगसामाजिक
भारतातील एरोसोल क्षेत्राला चालना देण्यासाठी मुंबईत इंडिया एरोसोल एक्स्पो २०२५ चे आयोजन

0
3
2
1
2
3
ü वैयक्तिक निगा, उद्योग, कृषी आणि एफएमसीजी क्षेत्रांना या सातत्याने सुरू असलेल्या पुनर्वापरयोग्य (रिसायकलेबल) उद्योगामुळे मिळते चालना
ü २०२३ मध्ये एरोसोल क्षेत्रातील स्थानिक उलाढाल ६३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी असून २०३१ पर्यंत ही उलाढाल १ (एक) अब्ज डॉलरपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.
नाशिक , १८ फेब्रुवारी २०२५ : मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत सहावे इंडिया एरोसोल एक्स्पो (आयएई २०२५) हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. आयएई २०२५ हा एरोसोल (स्पे) उद्योगाला समर्पित असलेला भारतातील एकमेव व्यापारी मेळा असून या प्रदर्शनात वैयक्तिक निगा, आरोग्यसेवा, ऑटो केअर, अॅग्री केअर, होम केअर, स्प्रे उत्पादने, पेंट स्प्रे, इंडस्ट्रिअल ल्युब्रिकंट्स, क्लीनर्स व कोटिंग स्प्रे ही उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि या प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय व जागतिक पातळीवरील एरोसोल उद्योगातील तज्ज्ञ व इनोव्हेटर्स एकत्र येणार आहेत.
एपीसी चे मानद सचिव व उपाध्यक्ष हरिश अरोरा म्हणाले की , नवनवीन संकल्पना, पर्यावरणपूरकता आणि या उद्योगाच्या वाढीवर भर दिल्यामुळे इंडिया एरोसोल्स एक्स्पो २०२५ मध्ये वैयक्तिक निगा, आरोग्य सेवा, औषधनिर्मिती, दैनंदिन कामांसाठी होणारा वापर, ऑटो केअर, पेंट आणि रासायनिक उद्योगांसह विविध क्षेत्रांतील वरिष्ठ पातळीवरील खरेदीदार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. पॅकेजिंगसाठी नवीन पर्याय शोधणे आणि प्रायव्हेट लेबल एरोसोल उत्पादनांची माहिती घेण्यासाठी ते या प्रदर्शनात येणार आहेत. ग्राहकांच्या सवयींमध्ये वेगाने होणारे बदल, वाढते उत्पन्न आणि पर्यावरणपूरक उत्पादनांवर वाढता भर यामुळे भारतातील एरोसोल उद्योग दरवर्षी सुमारे ८ टक्क्यांनी वाढत आहे. याला मुख्यतः वैयक्तिक निगा, शेती, उद्योग आणि एफएमसीजी क्षेत्रांतील वाढीमुळे चालना मिळत आहे. २०२३ मध्ये ६३५ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या घरात असलेली देशांतर्गत एरोसोल बाजारपेठेची उलाढाल २०३१ पर्यंत एक अब्ज अमेरिकी डॉलरचा आकडा ओलांडण्याचा अंदाज आहे.
एरोसोल उत्पादने स्प्रे, प्रवाह, जेल, फेस, लोशन किंवा गॅस स्वरूपात वितरित करण्यासाठी तयार करण्यात येतात. यासाठी धातू, काच आणि आता प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर केला जातो. एअर फ्रेशनर्स, हेअर स्प्रे, सॅनिटायझर्स, परफ्यूम, ड्राय शँपू, कीटकप्रतिबंधक, डिओडरंट, क्लिनिंग एजंट, कार कॉस्मेटिक्स, पेंट आणि वार्निश यांसारख्या दैनंदिन कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांसाठी एरोसोल उत्पादने वापरण्यात येतात. तसेच, आरोग्यसेवेमध्ये सॅनिटायझर, इनहेलर, वेदनाशामक उपाय, भूल देणारी औषधे यांसाठीही त्याचा उपयोग केला जातो. शेतीमध्ये कीटकनाशक आणि खतांच्या फवारणीसाठीही याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तसेच, देखभालीशी संबंधित उत्पादनांसाठी औद्योगिक प्रक्रियेसाठीही याचा उपयोग केला जातो.
प्रदर्शक आणि या मेळ्यास भेट देणाऱ्या अभ्यागतांना या प्रदर्शनाचा उपयोग व्हावा या उद्दिष्टाने विविध परिसंवाद आणि परिषदांचेही आयोजन करण्यात आले आहे. यात जागतिक आणि भारतीय ट्रेंड्सवर चर्चा होणार असून उत्पादकता वाढवण्यासाठी तांत्रिक चर्चासत्रे आणि भविष्यातील वाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानविषयक माहिती देण्यात येईल. जॉइंट व्हेंचर, मार्केटिंग संदर्भातील भागीदारी, घाऊक करार आणि भारतात कराराधारित उत्पादन भागीदार शोधणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी ही हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.
0
3
2
1
2
3