Breaking
क्रिडा व मनोरंजन

लतादीदींच्या गाजलेल्या गीतांची सुरेल मैफल बुधवारी रंगणार

0 3 2 1 2 3

नाशिक /किरण घायदार…

महान पार्श्वगायिका भारतरत्न लतादीदींच्या २८ सप्टेंबर रोजी असलेल्या जयंतीनिमित्त शिवरंजनी म्युझिकल स्टुडिओ व अफलातून म्युझिक लव्हर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गॉडेस सिंगर – लता मंगेशकर’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांचा हा विनामूल्य कार्यक्रम बुधवारी (दि.१८) संध्याकाळी ६ वाजता प. सा.नाट्यगृह येथे होईल.
या कार्यक्रमात नाशिकमधील सुप्रसिद्ध गायिका वर्षा संगम, सुवर्णा भारंबे, पौर्णिमा गुप्ता, आरती ओक, स्वाती भागवत, सुषमा दौंडे या लतादीदींची गाजलेली गाणी सादर करतील. त्यांना कैलास कपाटे, सतीश रणदिवे, सारंग हुदलीकर, चंद्रकांत महाले हे गायक सुरेल साथ करणार आहेत. उमेश मालवी, श्याम जाधव, दिलीप पवार, जयंत तोडकर, अभिलाशा पाटील हे पाहुणे गायक लाभले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश ठक्कर व सुनील एकार हे करतील.
प्रमुख पाहुणे म्हणून अफलातून म्युझिक लव्हर्सचे अध्यक्ष हरीशभाई ठक्कर उपस्थित रहाणार आहेत. प्रकाश गोसावी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. ध्वनीसंयोजन पवन वंजारी यांचे असेल. रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवरंजनी म्युझिकल स्टुडिओचे अध्यक्ष राजेंद्र भुजबळ व संयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे