Breaking
सामाजिक

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीमध्ये चिमुकल्यांनी फुंकले प्राण !

0 3 2 1 2 3

किरण घायदार…

नाशिक (प्रतिनिधी) – निरागस विशेष बालके अधिक चंचल, संवेदनशील असतात. अशा चिमुकल्यांनी एकाग्रतेने शाडूमातीच्या सुबक गणेशमूर्ती तयार केल्या. ओल्यामातीला सुबक आकार देत त्या मूर्तींमध्ये प्राण फुंकले. बघता बघता पर्यावरणपूरक बाप्पा तयार झाले आणि सर्वांनी गणरायाचा जोरदार जयघोष केला. गणपती बाप्पा मोरयाsss अश्या निनादात गणेशमूर्ती कार्यशाळेत सर्वजण तल्लीन झाले.
रायझिंग चाईल्ड डेव्हलपमेंट अँड लर्निंग सेंटरमध्ये निरागस बालकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काल शाडूमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. संस्थापिका व विशेष बालकांच्या तज्ज्ञ प्रशिक्षिका मोनिका गोडबोले – यशोद यांनी प्रास्ताविकात गणेशोत्सवाची थोडक्यात माहिती दिली. अनुष्का यशोद व मयूर कारंडे यांनी सोप्या पद्धतीने बाप्पाची मूर्ती कशी तयार करायची याचे मार्गदर्शन केले. मुलांनी कल्पकतेने अतिशय सुंदर व प्रमाणबध्द मूर्ती तयार केल्या. विशेष म्हणजे या कार्यशाळेत काही पालक, डॉक्टर्स तसेच इतर मुले देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. त्यांनीही नवनिर्मितीचा आनंद मिळवला.
प्रीतेश शिरसाठ, ईशान भामरे, तपस्वी चव्हाण, काव्या पालवे, अनुश्री बोहरा, ईशान धवन, मोहांश व देवांश पवार, ध्रुव शाह, पूनित कांकरिया, समीक्षा खांदवे, युग पाटील, सारांश गोयल, स्वरा कर्डिले, विराज गायधनी, वर्धन काळे तसेच सुवर्णा देशपांडे, लीना काळे, डॉ.प्रियांका शर्मा यांनी सुरेख गणेशमूर्ती तयार करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संस्थेचे विश्वस्त मिलिंद यशोद यांनी खाऊ वाटप करीत सर्वांचे आभार मानले. लवकरच वाळल्यानंतर या मूर्ती आकर्षक रंगांनी रंगविल्या जातील. मुलांच्या घरी या स्वनिर्मित गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे