Breaking
आरोग्य व शिक्षण

*विंचूर येथील कर्मवीर विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा*

*ढोल ताशा व लेझिमच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचे केले स्वागत*

0 3 2 1 2 3

*विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

*ढोल ताशा व लेझिमच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

     विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील नवीन विद्यार्थांचे मोठ्या उत्साह स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल, ताशा व लेझिमाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोफत पाठ्यपुस्तके व उपयोगी शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन ई यांनी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षा, इ 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ काका दरेकर, जगदीश काका जेउघले, अण्णा सयाजी दरेकर, पुंड साहेब, विद्यालयाचे पर्यवेक्षक जोपळे के जी, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक, पालक उपस्थीत होते. 

    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर के यांनी केले तर विद्यालयातील जेष्ठ शिक्षक भोसले व्ही सी यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे