महिरावणी येथे मातोश्री गि.दे. पाटील विद्यालयामध्ये नवागतांचे पुष्पवर्षाव करत स्वागत:
शाळेचा पहिला दिवस; पाठ्यपुस्तकांचे वाटप
नाशिक : प्रतिनिधी
ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात शनिवारी पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळा प्रवेशाचा उत्सव ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच कचरू वागळे यांच्या शुभहस्ते,सामाजिक कार्यकर्ते अँड. कैलास खांडबहाले,पालक गोरख गवळी,कोरडेबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी दाखल झालेल्या नवागतांचे गुलाब पुष्प, चॉकलेट,पेन देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय एकात्मिक मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.शालेय पोषण आहार अंतर्गत इयत्ता सहावी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना निष्ठाण्य तसेच मसालेभात वाटप करण्यात आले.प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा भामरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे, देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले खंडू लांबे दिलीप खांडबहाले विलास येवले यांनी परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षक संजय पवार यांनी आभार मानले.