Breaking
निवडब्रेकिंगराजकियसत्कार

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी डी.के. जगताप

0 3 2 1 2 3

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी डी.के. जगताप, उपसभापतीपदी संदीप (ललित) दरेकर

शरद लोहकरे, लासलगाव

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक प्राप्त झालेली लासलगाव बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज बाजार समिती सभागृहात पार पडली. लासलगाव बाजार समितीची निवडणूक म्हटली की संपूर्ण जिल्ह्याचे लागलेले असते. ठरलेल्या आवर्तना नुसार सभापती पदासाठी डि.के नाना जगताप यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांचे बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. उपसभापती पदासाठी राजेंद्र बोरगुडे व ललित दरेकर अशा दोन संचालकांचे अर्ज प्राप्त झाले. परंतु माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर राजेंद्र बोरगुडे यांची माघार झाली. ललित दरेकर यांच्या नावाची उपसभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विनंतीला मान देऊन ही निवड बिनविरोध होत आहे असे संचालकांनी आपल्या मनोगतात सांगितले.
याप्रसंगी माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींना शुभेच्छा दिल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. निवडणूक प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांनी महत्त्वाची भूमिका ठरली .
या प्रसंगी सर्व संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक निफाड, व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नरेंद्र वाढवणे यांनी काम पाहिले.
गणेश नगर येथे डिके नाना जगताप यांच्या सभापतीपदी निवड झाल्यामुळे फटाक्यांची आतिशबाजी करत स्वागत केले सर्व समाज बांधवांच्या वतीने गणेश मंदिरात नागरी सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी ज्ञानेश्वर जगताप यांची बिनविरोध निवड झाली. 12/4/2025 भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नवनियुक्त सभापती ज्ञानेश्वर जगताप यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच भावी उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे