राजकिय
आमदार पंकज भुजबळ यांनी विंचूर गटातील विविध गावांना भेटी दिल्या

0
3
2
1
2
3
नाशिक, येवला,दि.५ नोव्हेंबर :- राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज आमदार पंकज भुजबळ यांनी विंचूर गटातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहे. विकास हि अविरत चालणारी प्रक्रिया असून मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून यापुढील काळातही विकासाचा हा रथ अविरत पुढे जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

यावेळी येवला मतदारसंघाच्या विकासासाठी आपणस सर्वांनी एकमताने मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठीशी राहायचे आहे असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब भवर, माधव जगताप यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांना विक्रमी मतांनी निवडून देऊ असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

आमदार पंकज भुजबळ यांनी आज येवला विधानसभा मतदारसंघातील विंचूर गटात विविध गावांना भेटी दिल्या. बोकडदरा, डोंगरगाव, नांदगाव, भरवस, मानोरी खु., वाहेगाव, गोळेगाव, दहेगाव, गोंदेगाव, मरळगोई खु., मरळगोई बु., पाचोरे खु., पाचोरे बु. या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, कैलास सोनवणे, दत्तूपंत डुकरे, विजय सानप, सचिन दरेकर, बाळासाहेब पुंड, विलास गोरे, रघुनाथ सानप, भाऊराव दराडे, माधव सानप, शरद कांदे, विनायक माळी, भीकलाल भिडे, सुरेश म्हस्के, अतुल म्हस्के, ज्योती दराडे, अशोक नागरे, शांताराम नागरे, जगन काकड, प्रकाश काकड, नंदू नागरे, हरी नागरे, भाऊराव सांगळे, रज्जाक पठाण, प्रदीप तीपायले, दादा मूदगुल, रतन मूदगुल, कृष्णा मूदगुल, अनिल नीखाडे श्रावण मूदगुल, दिलीप मुदगुल, बाळासाहेब मुदगुल,बाबासाहेब काजळे, दौलत मूदगुल, माणिक मूदगुल,सर्जेराव मूदगुल, शरद मूदगुल, वाल्मीक मूदगुल, शरद शिंदे, मोतीराम मूदगुल, दत्तू मूदगुल, संदीप निखाडे, नारायण निखाडे, प्रभाकर मूदगुल, बापू मूदगुल, अमित मूदगुल, संतोष मूदगुल, पप्पू फापाळे, दत्तू ठोंबरे, रमेश मूदगुल, मच्छिंद्र मूदगुल, विजय मूदगुल, दिगंबर मुदगुल, रामभाऊ मूदगुल, पांडूरंग मूदगुल, सोमनाथ मूदगुल, अंकुश मूदगुल, अनिकेत मूदगुल, रोहन मूदगुल, प्रसाद निखाडे, प्रसाद मूदगुल, रघुजी मूदगुल, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
0
3
2
1
2
3