Breaking
सत्कार

*निफाड महसूल प्रशासनाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

0 3 2 1 2 3

सरकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण : तहसीलदार विशाल नाईकवाडे *

*निफाड महसूल प्रशासनाच्या वतीने पत्रकारदिना निमित्त पत्रकारांचा सन्मान *

शरद लोहकरे, लासलगाव…

 “पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. समाजातील सत्य आणि पारदर्शकता जपण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करतात. त्यांच्या लेखणीमुळे समाजाला योग्य दिशा मिळते. शासनाच्या योजना सोप्या शब्दांमध्ये नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य पत्रकार करत असल्यामुळे शासनाचा लोकजागृतीचा बराचसा ताण हलका होतो असे कौतुक निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले. 

        पत्रकार दिनाचे औचित्य साधून (दि.०६) निफाड तहसील कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. राजीव तांबाळे (उपअधीक्षक, जिल्हा रुग्णालय, निफाड), डॉ. सुजित कोशिरे (तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती, निफाड),प्रशांत बोरसे विस्तार अधिकारी( ग्रामपंचायत)

 पंचायत समिती निफाड,अरुण खांगळ (निफाड तालुक्याध्यक्ष), निवासी नायब तहसीलदार श्रीमती दिपाली खेडेकर, जेष्ठ पत्रकार हारूनभाई शेख ॲड. शेखर देसाई आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकारांना लेखणी, डायरी व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला . उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या योगदानाची प्रशंसा करत त्यांना प्रेरणा देणारे मनोगत व्यक्त केले.

” समाजाचा खरा ‘दर्पण’ पत्रकार आहेत. त्यांच्या कार्यातून लोकशाहीस बळकटी येते. त्यामुळे हा फक्त पत्रकारांचा सन्मान नसून समाजाच्या आवाजाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बातमीचा धांडोळा घेतांना पत्रकार पूर्णवेळ प्रयत्नशील असतात. त्यामुळे वेळेची मर्यादा न पाळता कार्यरत असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम एक दिवसीय नसून वर्षभरात केव्हाही ग्रामीण रुग्णालय निफाड येथे आरोग्य तपासणी करण्याची संधी पत्रकारांना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारितेचा भूतकालीन आढावा आणि वर्तमान परिस्थिती या विषयी त्यांनी भाष्य केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी केले. 

*तालुक्याचा ज्ञानकोश बनविण्याचा मानस :-*  निफाड तालुक्याला मोठा इतिहास लाभलेला आहे. तो जगभर पोहचावा यासाठी तालुक्याचा ज्ञानकोश बनविण्याचा मानस असल्याचे तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगत या कार्यात मदत करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. ज्ञानकोश किंवा संदर्भकोष तयार झाल्यास नागरिक आणि विद्यार्थांना तालुक्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात पत्रकार भवनासाठी लागणारी शासकीय पातळीवरील मदत करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे