Breaking
गुन्हेगारी

जुन्या भांडणाची कुरापत काढत कोयत्याने मारहाण

0 3 2 1 2 3

शरद लोहकरे, लासलगाव

पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढत खेडलेझुंगे येथे २७ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मारहाण करण्यात आली. खेडलेझुंगे ग्रामपंचायतचे सरकारी विहिरीजवळ खरडी परिसरात फिर्यादी किरण विक्रम सोनवणे यास चार जणांनी मिळून जबर मारहाण केली.लासलगाव पोलीस स्थानकात किरण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज मच्छिंद्र गोधडे ,बबलू उर्फ गोविंद त्रंबक गोधडे,प्रल्हाद रोहिदास सोनवणे,गोविंद राजू पवार (सर्व राहणार खेडलेझुंगे) या चार आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आले. आरोपींनी रात्री अकराच्या सुमारास ग्रामपंचायत विहिरीजवळ फिर्यादी सोबत १५दिवसांपूर्वी आमचेशी भांडण का केले ..? अशी कुरापत काढत शिवीगाळ आणि दमदाटी केली तसेच आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कुऱ्हाडीने उजव्या दंडावर घाव घातले आणि कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली.यात फिर्यादीस किरण सोनवणे यास जबर दुखापत झाली असून त्यास उपचारार्थ नैताळे येथे दाखल केले आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे