आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात साजरी
UDYAM-MH-23-0313678
0
4
2
9
5
7
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन केले.
हा कार्यक्रम इयत्ता 10वी ब च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या घडवून आणला. यावेळी विद्यालयातील, जाधव स्नेहल, शिंदे रसिका, प्रतिक्षा जाधव, पद्मनाभ आभाळे (10ब ) सिद्धी बंद्रे, धनश्री वाळेकर (6क) या विद्यार्थ्यांनी भाषणातून गुरु विषयीचे आपले मत व गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी व्यक्तिला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर,एक तरी गुरु असावा असे मत व्यक्त केले. तसेच विद्यालयाचे उप मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टीतून गुरूचे महत्त्व समजावून सांगताना”जे जे चांगले ते ते घ्यावे व जे जे ते नको ते सोडावे ” असा गुरुमंत्र दिला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करून आपली गुरु विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रावणी गोराडे व धनश्री पुंड यांनी केले, भक्ती चेवले हिने उपस्थित सर्वांचे आभार मानले.सदर कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक माळी एस टी,चांदे आर के लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था, सातारा विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते
0
4
2
9
5
7



