
0
3
2
1
2
3
लासलगाव वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्रास संस्थेच्या सचिव भारती भिडे, शर्मिला साळुंके यांची भेट
लासलगाव / प्रतिनिधी :- वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्र या संसथेद्वारे लासलगाव विंचूर येथे घेण्यात आलेल्या ‘बालवाडी शिक्षिका व व्यक्तिमत्व विकास’ या वर्गाचा समारोप आणि प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक वाटप हा कार्यक्रम संपन्न झाला.
यासाठी आणि शाखा तपासणीसाठी संस्थेच्या पुणे येथील सचिव भारती भिडे तसेच शर्मिला साळुंके यांनी भेट दिली. त्यांनी लासलगाव विंचूर या शाखेत सुरु असलेल्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी अनिता गंधे, शिरीष गंधे, यशश्री जोशी, संगीता साखरे,योगीता आंबेकर तसेच वनस्थळीच्या सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.
0
3
2
1
2
3