Breaking
गुन्हेगारी

लासलगावला 52 हजार 590 रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त

0 4 2 9 5 7

लासलगाव – येथील साईनगर परिसरातील एका गाळ्यामध्ये साठवून ठेवलेला अंमली पदार्थांचा साठा लासलगाव पोलीसांनी छापेमारीत पकडला. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कामगिरी आज दि. 13 रोजी दुपारी केली. या कारवाईत संशयित शैलेश नंदकुमार बागमार यांना ताब्यात घेत सुमारे 52 हजार 590 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लासलगाव येथील साई नगरमध्ये एका गाळ्यात पांढर्‍या गोण्यांमध्ये सुगंधीत तंबाखू व जर्दा गुटखा जो शरीरास हानीकारक आहे. असा मुदेदमाल साठवूण ठेवल्याची माहिती पोलीसांना मिळाली त्यानुसार वरील ठिकाणी छापेमारी केली असता वेगवेगळ्या पॅकेट व बॉक्समध्ये ठेवलेला अंमली पदार्थ साठा आढळून आला. त्याची किंमत सुमारे 52 हजार 590 रूपये इतकी आहे. ही कारवाई आज दि. 13 रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी संशयित आरोपी शैलेश नंदकुमार बागमार (वय 21) यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदिप डगळे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुरनं. 261/भा.न्य.संहिता कलम 123, 223, 274, 275 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनिरीक्षक साळुंके करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे