विंचूर येथे जगदंबा माता मंदिर जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा
विंचूर – भवानी पेठ म्हणजे विंचूर गावातील प्रसिद्ध बाजारपेठ दर आठवड्याचा बाजार या ठिकाणीच भरतो. याच ठिकाणी 100 वर्षांपूर्वी ढवण परिवारातल्या पूर्वजानी जगदंबा मातेची स्थापना केली. आणि या ठिकाणी देवीचे मंदिर स्थापन झाल्यामुळे या परिसराला भवानी पेठ नावाने नंतर नावलौकिक मिळाला. ही मूर्ती अष्टदशभुजा आहे. ही मुर्ती लुकनापासून तयार केली गेलेली आहे. सन 1983 पर्यंत चैत्र पौर्णिमेमध्ये गावामधून मिरवणूक निघत असे.
आता नवीन मूर्ती जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा समस्त ढवण परिवार, भवानी पेठ मित्र मंडळ व ग्रामस्थ विंचूर यांच्यावतीने तीन दिवस आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक 28 शुक्रवार रोजी राजस्थान या ठिकाणावरून बनवून आणलेली श्री जगदंबा माता नूतन मूर्तीची सवाद्य ग्रामप्रदक्षणा मिरवणूक सकाळी आठ वाजता काढण्यात येणार आहे त्यानंतर अकरा वाजता ब्राह्मणद्वारा चतुर्वेद शांती सूक्त पठण, जगदंबा माता प्राणप्रतिष्ठा कार्यारंभ प्रायश्चित संकल्प,प्राणप्रतिष्ठा प्रधान संकल्प,गणेश पूजनादि संपूर्ण पंचगविधी, मंडप प्रवेश,मंदिराची वास्तुपूजा. त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये दुपारी दोन वाजता योगिनी पूजन, क्षेत्रपाल/ भैरव मंडल पूजन,प्रधान सर्वतोभद्र मंडल पूजन,देवता अभिषेक,कुटीर हवन,पूर्वक श्रींच्या मूर्ती जलाधीवास, सायंकाळी पूजा मंगल आरती व प्रसाद इत्यादि असणार आहे.
शनिवार रोजी सकाळी ९ वाजता ब्राह्मणद्वारा चतुर्वेद शांतीसूक्तपठण,स्थापित देवता प्रात:पूजन अरणी मंथन द्वारा अग्निस्थापना, नवग्रह व रुद्र मंडल पूजन,नवग्रह हवन, शांती पौष्टिक हवन मूर्तीमूर्ती लोकपाल हवन, पराई हवन इत्यादी. द्वितीय सत्र मध्ये दुपारी दोन वाजता मूलमंत्र प्रधान हवन,मूर्ती व प्रासाद स्नपन विधी, श्रींच्या मूर्तीस शय्याधिवास न्यासविधी,ध्यानादिवास सायंकाळी पूजा मंगल आरती व प्रसाद. रविवार रोजी तिसऱ्या दिवशी ब्राह्मण द्वारा चतुर्वेद शांती सूक्त पठण,स्थापित देवता प्रात:पूजन, ब्रह्मशिला-कुर्मशिला स्थापना, पिंडीकान्यास, उत्तरांग हवन ,महाबलीपूजन, महाराज श्रींच्या हस्ते ठीक १२:१५ वा अभिजीत मुहूर्तावर श्री जगदंबा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा व शिखर कलशारोहन सोहळा महंत स्वामी जनेश्वरानंदजी महाराज (भारत माता आश्रम विंचूर) व ह. भ. प. गणपत महाराज नागरे ( भगरीबाबा आश्रम धारणगांव) यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. यज्ञाची पूर्णाहूती व महाआरती इत्यादी रविवार रोजी असणार आहे त्यानंतर १२:३० ते ३ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण तीन दिवसीय कार्यक्रम ब्रह्मवृद यज्ञाचार्य पं. सचिन मुकुंदराव जोशी व सहकारी ब्रह्मरुंद विंचूर यांच्याकडून केला जाणार आहे. कार्यक्रमाला व महाप्रसादाला उपस्थित राहण्याचे आव्हान ढवण परिवार, भवानी पेठ मित्र मंडळ व विंचूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.