मविप्र संचालक संदीप गुळवे यांना रमेश जाधव यांनी दिल्या शुभेच्छा

इगतपुरी : मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक युवा नेते संदीप गुळवे यांना जन्मदिनाच्या निमित्ताने काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी घोटी येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जयराम धांडे, शिवाजी शिरसाठ, रमेश संपत वाजे, सुदाम भोर आदी उपस्थित होते. स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे यांचे सुपुत्र संदीप गुळवे यांच्या घोटी येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. कै. गोपाळराव गुळवे यांचा आदर्श डोळ्यासमोर युवा नेते संदीप गुळवे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवीत असतात.अभिष्टचिंतनाच्या दिवशी आरोग्य शिबिरासह राबविलेले विविध सामाजिक उपक्रम नक्कीच प्रेरणादायी असल्याचे काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी सांगितले.