Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिकसत्कार

विंचूर विद्यालयाची एन एम एम एस परीक्षेत उत्तुंग यशाची परंपरा कायम!

0 3 2 1 2 1

रयत शिक्षण संस्थेचे,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,विंचूर ता.निफाड जि. नाशिक एन एम एम एस परीक्षा सन 2024-25 एकूण 98 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 32 विद्यार्थी पास झाले आहेत पैकी 20 विद्यार्थी एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत, सदर विद्यार्थ्यांना भारत सरकार मार्फत प्रत्येकी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी दिवटे तनुष्का मनोज, निकम सारंग ज्ञानेश्वर, पेंढारे हर्षल सचिन, दरेकर दर्शन सुनिल, जाधव सार्थक शिवाजी,नवले आदित्य भागवत, नेवगे तेजस अशोक ,नेवगे श्रावणी निलेश, शेवाळे श्रेयश संदीप, बागले शुभांगी बाळकृष्ण, काळे ओम मोहन ,निकम ज्ञानेश्वरी गोरख, पाटील ज्ञानेश्वरी हरिभाऊ,मोरे सोहम प्रकाश, पवार प्रदीप धनराज ,बिडे प्रतिक चंद्रसिंग, वडघुले आरती अजित, काळे कृष्णा सुमित, मघाडे स्वयम देविदास, खर्डे आयुषी योगेश.

सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी – गीते साक्षी किरण,जेऊघाले समीक्षा विष्णू,डुंबरे संपदा उल्हास,झाल्टे गार्गी मुकुंद,जेऊघाले आदित्य कैलास,जेऊघाले श्रुती विलास सदर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येकी 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कार्य कुशल मुख्याध्यापक देवढे एन ई यांच्या नेतृत्वात,विभाग प्रमुख,सारूक्ते यू ए तसेच विषय शिक्षक वानखेडे ए.एस इंग्रजी,गवळी एस.जे मराठी,पवार ए.ए बुद्धिमत्ता,सावळे ए.वाय गणित,कतवारे के.एस विज्ञान यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ ,उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी,विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जगदीश काका जेऊघाले ,अनिल दरेकर, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक,वाबळे एस एम,पर्यवेक्षक के.जी.जोपळे, माळी एस टी,लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

3/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे