Breaking
आंदोलन

सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ आषाढी एकदशी च्या दिवस होणाऱ्या संपावर ठाम

0 3 2 1 2 3

किरण घायदार, नाशिक

सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघांचे केंद्रिय अध्यक्ष मा.आमदार गोपीचंद पडळकर ,केंद्रिय मुख्यकार्याध्यक्ष मा. सदाभाऊ खोत ,आणि मा. सतीशदादा मेटकरी सरचिटणीस ह्यांनी कामगार हितासाठी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने सातव्या वेतन आयोगा प्रमाणे वेतनासह प्रलंबित 16 मागण्या च्या पूर्ततेसाठी सरकार ला 17 जुलै रोजी एक दिवशीय संपाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने प्रशासनाने आर्थिक मागण्या सोडून इतर विषयावर ????????सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाला बैठकीसाठी बोलावन्यात आले होते.उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री माधव कूसेकर  यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीस महाव्यवस्थापक श्री मोहनदास भरसट, आणि मुख्याकामागर अधिकारी कोनावडेकर आणि ????????सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून सरचिटणीस मा. सतीशदादा मेटकरी,मा.कार्याध्यक्ष किशोर लोणारे साहेब,आणि राज्य उपाध्यक्ष मा. आशिषजी बाळसराफ, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश पाटील, सचिन ढेरे यांची या बैठकीसाठी उपस्थिती होती. ह्या बैठकीत प्रशासनाला कर्मचाऱ्यावर कसा अन्याय केला जातो, अन्याय कारक परिपत्रके कशी काढली जातात यावर विस्तृत अशी चर्चा कारण्यात आली.
………………………………………
प्रमुख मागण्या
……………………………………….
⭕ सातव्या आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी
⭕ एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची व नोकरीची हमी राज्य शासनाने घ्यावी
⭕ आंदोलन काळातील पगार कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा.27आक्टोबर 2021 ते 22 एप्रिल 2022 पर्यंतचा आंदोलन काळ हा विशेष बाब म्हणून वार्षिक वेतन व उपदाणासाठी ग्राह्य धरण्यात यावा
⭕ शिस्त व आवेदन पद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात याव्या
⭕ मेडिक्लेम कॅशलेश योजना लागू करण्यात यावी (पोलीस खात्याच्या धरतीवर )
⭕ कोविड काळातील कोरोना भत्ता देण्यात यावा
⭕ वेतन वाढीचा दर सुधारण्यात यावा
⭕ गणवेश शिलाई भत्ता बाजार भावप्रमाणे देण्यात यावा
⭕ लिपिक पदासाठी 240 दिवसाची अट रद्द करण्यात यावी
⭕ 5150 इलेक्ट्रिक बसेस संदर्भात निर्णय घेतला आहे. परंतु सदर बसेस ह्या महामंडळाच्या स्वमालकीची देण्यात यावी
⭕ एस टी कामगार वैद्यकीय दृष्ट्या अपात्र झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या पाल्याना सेवेत सामावून घेण्याबाबत निर्णय
या मागण्या पूर्ण करण्यासाठी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाकडून आषाढी एकादिवशी च्या दिवशी एक दिवशीय संपच्या नोटीस
वरून प्रशासनाने सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाला आषाढी एकादिवशी च्या दिवशी पुकारलेला संप मागे घेण्याची विनंती केली. परंतु सरचिटणीस मा.सतीशदादा मेटकरी यांनी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा महत्वपूर्ण असून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, आणि एस टी कर्मचारी अर्थीक दृष्ट्या सदृढ झाला पाहिजे.ह्या आंदोलनात मा. पडळकर साहेब आणि सदाभाऊ खोत साहेब उतरणार असल्याने महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत त्यामुळे संघर्ष हा अटळ आहे असे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे