Breaking
क्रिडा व मनोरंजन

“आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” चित्रपटाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया !!

0 3 2 1 2 3

बहुचर्चित ‘आम्ही जरांगे’ – गरजवंत मराठ्यांचा लढा” हा सिनेमा आखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले मराठा क्रांतिवीर मनोज जरांगे पाटील, अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील यांचा 1980 पासून ते आजपर्यंतच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचा इतिहास या सिनेमात दाखवला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकढुन भरपूर चांगला प्रतिसाद मिळतोय.

“नव्या पिढीला प्रेरणा देणारा चित्रपट असून हा सिनेमा प्रत्येक मराठा तरुण-तरुणी, वृद्ध,लहान मुलांसह सगळ्यांनी एकत्र पाहावा असं सिनेमा पाहून आलेल्या एका चाहत्याचं म्हणणं आहे.”

आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतोय त्यामुळे प्रेक्षकांसाठी खासकरून मराठ्यांसाठी हा सिनेमा खूपच प्रेरणादायी ठरतोय.

“प्रत्येक समुदायाचे समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी हा चित्रपट नक्कीच प्रेरक आहे. मराठ्यांनो आता तरी जागे व्हा हे चित्रपट पाहताना प्रत्येक क्षणाला जाणवते.” अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दर्शवली आहे

इतकच नव्हे तर “मराठी लेकरांची होणारी परवड, मानसिक वाताहत आणि चित्रपटात दखवलेली सत्य परिस्थिती मन सुन्न करुन टाकते पण ध्येयवेडा मराठा कालही आणि आजही समाजात सर्व स्तरात आपले प्रभूत्व गाजवतोय हे नक्की. मराठी विद्यार्थी यशस्वी कसा उभा राहु शकतो हे एका शेतकरी कुटुंबाने उत्तम रित्या दर्शवले आहे.” अशी सुद्धा प्रतिक्रिया चाहत्यावर्गाने व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित या चित्रपटाविषयी प्रेक्षकाचं प्रेम आता शिगेला पोहोचलय, त्यामुळे “आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” नंतर पार्ट 2 ची वाट आतुरतेने पहतोय असं प्रेक्षक बजावून सांगत आहेत.

नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित या चित्रपटाचे सह निर्माते उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, दादा दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा – पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे संवाद सुरेश पंडित, संजय नवगिरे व किशोर गरड यांनी लिहिले असून, या चित्रपटाचे छायाचित्रकार विकास सिंह हे आहेत. ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” आता सर्वत्र प्रदर्शित.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे