Breaking
सामाजिक

महासंगणकाचे जनक डॉ.विजय भटकर सन्मानित

संत ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कार शिबिर संपन्न

0 3 2 1 2 3

नाशिक:प्रतिनिधी 

विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारे थोर शास्त्रज्ञ, भारताच्या पहिल्या सुपर कम्प्युटरचे जनक, भारताच्या संगणक क्रांतीचे शिल्पकार,पद्मभूषण,थोर वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांचा महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाकडून मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देत सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे,संजय पवार उपस्थित होते.

      यावेळी महिरावणी येथील भूमिपुत्र संगणकतज्ञ सुनील खांडबहाले यांच्या ‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह यांवर लिहिलेले ‘ कोऽहम- अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे प्रकाशन भारतीय ‘परम’ या सुपर-कॉम्प्युटरचे जनक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते महिरावणी परिसरातील संत ज्ञानेश्वर माऊली पाल संस्कार शिबिरात पुस्तक प्रकाशन झाले.यावेळी मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्यावतीने त्यांचा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे, संजय पवार उपस्थित होते.  

   यावेळी कार्यक्रमास डब्ल्यूएनएसचे मुख्य प्रबंधक अरविंद कुलकर्णी, स्लाईडवेलचे मानवसंसाधन प्रबंधक अजय इप्पर,अंनिसचे महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे, ‘एमकेसीएल’चे नाशिक विभागप्रमुख सुभाष पाटील, मुख्याध्यापक वसंत सालगुडे, प्रगतिशील शेतकरी दिगंबर ढगे,शांताराम चव्हाण, सुनील खांडबहाले व त्यांचे आई – वडील मीराबाई खांडबहाले व शिवाजी खांडबहाले आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे