ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगसामाजिक
सेलिब्रिटी मास्टरशेफ चॅलेंजविषयी राजीव म्हणतो…

0
3
2
1
2
3
सेलिब्रिटी मास्टरशेफ चॅलेंजविषयी राजीव म्हणतो: सतत सर्जनशील राहणे महत्त्वाचे आहे
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ हा रियालिटी शो स्वाद, नाट्य आणि अटीतटीची स्पर्धा यांचे सप्रमाण मिश्रण सादर करतो. फराह खानचे सूत्रसंचालन लाभलेल्या आणि प्रसिद्ध शेफ विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या शोमध्ये स्पर्धा अधिकाधिक चुरशीची होत चालली आहे. प्रत्येक चॅलेंजमध्ये स्पर्धकांना त्यांच्या कक्षा आणखी विस्तारित कराव्या लागत आहेत आणि इथले किचन तर जणू युद्धभूमी झाली आहे, जिकडे वेगवेगळ्या रणनीती उलगडत आहेत, युतीची कसोटी होत आहे आणि अनपेक्षित वळणे सगळ्यांना सतर्क ठेवत आहेत. यातील नाट्याचा अर्थ लावण्याअगोदरच परीक्षकांनी स्पर्धकांना एक धक्कादायक वळण दाखवले आहे. त्यांच्यासमोर ‘फूल और कांटे’ आव्हान फेकले आहे. या आव्हानात खेळी पूर्ण उलटू शकते!
मिस्ट्री बॉक्स उघडले आहेत आणि विजयाचे पारडे आलटून पालटून वेगवेगळ्या बाजूस झुकत असताना स्पर्धा फारच अटीतटीची झाली आहे. अशा वेळी हे आव्हान स्पर्धकांसाठी एक संधी ठरेल की शिक्षा ठरेल? वाढती स्पर्धा आणि वेगाने पुढे सरकत असलेले घडयाळ या शोमधील तीव्रता अधिकच वाढवत आहेत. कोणतेही आव्हान म्हटले की, प्रत्येक निर्णयाचे परिणाम समोर येतात. अशा दडपणाखाली कोण बहरू शकेल आणि कुणाच्या नशिबी काटेच येतील?
फूल और कांटे आव्हानाविषयी राजीव अदातिया म्हणतो, “सेलिब्रिटी मास्टरशेफ चॅलेंज आधीच फार अवघड असतात, त्यात इतके प्रतिभावान शेफ आणि सेलिब्रिटीज आसपास असल्यावर ते आणखीनच अवघड होत जातात. फूल और कांटे आव्हान म्हणजे काही खायचे काम नव्हते! पण एक गोष्ट आम्हाला सतत प्रोत्साहित करत असते, ती गोष्ट म्हणजे आशा! आम्ही सर्व जण इथे आहोत कारण आमच्यात काही तरी विशेष आहे. शेवटी हेच महत्त्वाचे आहे की, नेटाने स्पर्धा लढवायची, सर्जनशील राहायचे आणि स्वतःलाच हे सिद्ध करून दाखवायचे की हेच आपले स्थान आहे.”
या शो मधील नाट्य, अनपेक्षित ट्विस्ट आणि सेलिब्रिटी मास्टरशेफ किताब मिळवण्यासाठीची चुरस अजिबात चुकवू नका. पाककलेच्या रिंगणात उतरलेल्या स्पर्धकांची टक्कर बघा सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
0
3
2
1
2
3