
सत्कार समारंभामुळे ऊर्जा मिळते – सपोनि भास्करराव शिंदे
आदित्य दरेकर चा सत्कार समारंभ संपन्न
विंचूर
एखाद्या खेळाडूने विशेष प्रावीण्य मिळवले आणि त्याचा सत्कार केला गेला तर त्याला चांगले पाठबळ मिळते. या पाठबळाच्या जोरावर तो ऑलम्पिक मध्ये सुद्धा मेडल मिळवू शकतो. सत्कार समारंभामुळे खेळाडूला ऊर्जा मिळते. असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले.
छत्तीसगड येथे संपन्न झालेल्या क्लासिकल नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये येथील आदित्य दत्तात्रय दरेकर याने सुवर्णपदक पटकावले त्याबद्दल श्याम काका दरेकर यांच्या वस्तीवर सोमवार दि. 27 रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी श्री शिंदे आपल्या मनोगतात बोलत होते.
सत्कार समारंभाच्या या कार्यक्रम प्रसंगी सपोनि भास्कर शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ललित दरेकर, विंचूर सरपंच सचिन दरेकर, माजी सरपंच अविनाश दुसाने, हनुमान नगर सरपंच गोपीनाथ ठुबे, डॉ. सुजित गुंजाळ, दत्तात्रय दरेकर, विंचूर प्रेस क्लब अध्यक्ष दादाभाई काद्री आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आदित्य दरेकर च्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ सुजित गुंजाळ, स.पो.नि. भास्कर शिंदे, अनिरुद्ध पवार अविनाश दुसाने,ह.भ.प. निलेश महाराज पवार, वसुधा जाधव आदींनी आपल्या मनोगतातून आदित्यला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंढरीनाथ दरेकर,दत्तात्रय शिरसाट, गंगाधर गोरे, मधुकर के. दरेकर, किशोर मवाळ, मधुकर बा. दरेकर,राजाराम दरेकर,राजेंद्र भारती, राजेंद्र शेवाळे, किशोर जेऊघाले, राजेंद्र दरेकर, भाऊसाहेब हुजबंद संदीप शिरसाट,नितीन गायकवाड, इस्माईल मोमीन, पुंजाराम खाडे, आबासाहेब दरेकर, सुदाम आव्हाड, नानासाहेब जेऊघाले, किशोर दरेकर, दिलीप चव्हाण, नितीन जेऊघाले, सुनिल चव्हाण, ज्ञानेश्वर शिरसाट, मुकेश गोराडे बाळासाहेब पवार, रामेश्वर रायते, दत्तात्रय दरेकर, सुनंदा दरेकर, दौलत दरेकर, शामराव दरेकर,छाया दरेकर, सिंधू दरेकर, प्रणव दरेकर, जगदीश दरेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी काद्री यांनी केले.तर हर्षल काळे यांनी आभार प्रदर्शन केले.