Breaking
क्रिडा व मनोरंजन

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 ला मिळाले त्यांचे ‘बेस्ट बारह’

0 3 2 1 2 3

मंच सजला आहे आणि प्रकाशझोत आणखी तेजस्वी झाला आहे, कारण सोनी एन्टरटेन्मेंट
टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 या डान्स रियालिटी शो मधल्या ‘बेस्ट बारह’ स्पर्धकांची निवड झाली आहे. ऑडिशन आणि मेगा ऑडिशनमध्ये देशाच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या,
अप्रतिम मूव्ह्ज दाखवणाऱ्या आगळ्यावेगळ्या स्पर्धकांचा झंझावात पाहिल्यानंतर करिश्मा कपूर, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या आपल्या ENT (एन्टरटेन्मेंट (मनोरंजन), न्यूनेस (नवीनता आणि टेकनिक (तंत्र)) स्पेशलिस्ट त्रिकूटाने अखेरीस सर्वोत्तम बारा स्पर्धकांची निवड केली आहे, जे या स्पर्धेत पुढील प्रवास
करतील. हे ‘बेस्ट बारह’ स्पर्धक आहेत – मुंबईचे अमोस माथी, अर्जुन साठे आणि आकांक्षा मिश्रा (अकीना), छत्तीसगडचा निखिल पटनायक, पटणाचा हर्ष केशरी, ओदिशाचा स्मृती स्वरूप पात्रा (नेक्स्टियन)
आणि दिव्यज्योती नाईक, उत्तराखंडचा दीपक साही (नेपो), बंगळूरची वैष्णवी शेखावत, मेघालयचा स्टीव्ह जिरवा, पंजाबची चित्राक्षी बत्रा आणि आसामचा रोहन चौधरी. या सगळ्या स्पर्धकांनी मंचावर यशस्वी होत
हे दाखवून दिले केले आहे की, या प्रतिष्ठित मंचावर टिकून राहून आपले कौशल्य निखारण्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत. दिनांक 3 आणि 4 ऑगस्ट रोजी ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षक पहिल्यांदाच या बेस्ट
बारह स्पर्धकांना त्यांच्या कोरिओग्राफर समवेत पाहतील. येथून पुढे ‘इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ चा चषक जिंकण्यासाठीचा त्यांचा प्रवास सुरू होईल.
 ‘आमची मुंबई’मधल्या बोरिवलीत राहणाऱ्या 23 वर्षीय अमोस माथीची खासियत ‘फ्रीस्टाइल’ आहे. अमोसने केवळ आपल्या डान्सनेच नाही, तर आपल्या खास बम्बईया शैलीच्या बोलीने परीक्षकांचे मन जिंकले. मुंबईच्या अर्जुन साठेने हाऊस डान्स आणि कंटेंपररी तसेच लिरिकल स्टाइलच्या अनोख्या फ्यूजनमधून आपली सर्जनशीलता आणि कौशल्य दाखवून प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली. अकीना नावाने ओळखल्या जाणाऱ्या आकांक्षा मिश्राने आपल्या मोहक लिरिकल डान्स कोरिओग्राफीच्या प्रत्येक मूव्हमधून भावना आणि टेकनिक यांचा सुमेळ साधत मुंबईचे प्रतिनिधित्व केले. छत्तीसगडच्या निखिल पटनायकने
दमदार कंटेंपररी शैलीमधून नेमकेपणा, लवचिकता आणि हावभाव यांचे उत्तम प्रदर्शन केले. पटणाच्या हर्ष केशरीने आपल्या आवेगी कंटेंपररी डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि दमदार टेकनिक व
भावनात्मक कथाकथन यांचे मिश्रण आपल्या डान्समधून दाखवले. ओदिशाच्या स्मृती स्वरूप पात्रा म्हणजे नेक्स्टियनचा हिप-हॉप आणि फ्रीस्टाइल डान्स परफॉर्मन्स पाहून तर खुद्द करिश्मा कपूरने त्याच्या सोबत
डान्स केला. ओदिशाहूनच आलेल्या दिव्यज्योती नाईकला होस्ट जय भानुशालीने प्रेक्षकांमधून शोधून काढले होते. पॉपिंग आणि बॉलीवूड कोरिओग्राफीचे मिश्रण आपल्या डान्समध्ये करून त्याने परीक्षकांना प्रभावित करत बेस्ट बारहमध्ये सहज स्थान मिळवले. नेपो या लाडक्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दीपक शाहीने
आपल्या वेगवान हिप हॉप शैलीने प्रेक्षकांना मुग्ध केले. आपल्या चपळ मूव्ह्ज आणि उत्तराखंडची अद्वितीय लय याची त्याने आपल्या डान्समध्ये सांगड घातलेली दिसली. बंगळूरहून आलेल्या वैष्णवी शेखावतने मॉडर्न कंटेंपररी डान्स कोरिओग्राफीमधून तरल हालचाली आणि हावभाव दाखवले, जे पाहताना परीक्षक अवाक झाले! ENT स्पेशलिस्ट्सने ज्याला सर्प्राइज पॅकेज म्हटले, त्या मेघालयच्या 17-वर्षीय स्टीव्ह जिरवाने आपल्या हिप-हॉप मूव्ह्ज आणि अप्रतिम फुटवर्कने परीक्षकांना थक्क करून सोडले.पंजाबहून आलेल्या चित्राक्षी बत्राने आपल्या ओपन स्टाइल कोरिओग्राफीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि कोरिओग्राफर वर्तिका झासोबत डान्स करण्याची संधीही तिला मिळाली. आसामहून आलेल्या रोहन चौधरीने आपल्या हिप-हॉप कोरिओग्राफीच्या बळावर मंच जिंकून घेतला.बेस्ट बारह’मध्ये स्थान मिळवण्यापर्यंतच्या या प्रवासात अविश्वसनीय प्रतिभा, पॅशन आणि परिश्रम यांचे दर्शन घडले. प्रत्येक स्पर्धकाने असामान्य कौशल्य आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. ज्यामुळे परीक्षकांसाठी बेस्ट बारह निवडणे कठीण होऊन बसले! ही स्पर्धा आता भलतीच रोमांचक होणार आहे, कारण हा प्रतिष्ठित खिताब जिंकण्यासाठी सगळे स्पर्धक आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून अहमहमिकेने एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतील.

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 च्या ग्रँड प्रीमियरमध्ये ‘बेस्ट बारह’ स्पर्धकांना परफॉर्म करताना बघा, 3 णि 4 ऑगस्ट रोजी रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे