Breaking
ई-पेपरकृषीवार्तादेश-विदेशमहाराष्ट्रसामाजिक

क्रेडाई करणार न्यू इंडिया समिटच्या ६व्या संमेलनाचे ७ व ८ मार्च रोजी नाशिकमध्ये आयोजन

भारतातील वेगाने वाढ होत असलेल्या शहरांतील विकासाच्या संधी शोधणार

0 3 2 1 2 3

क्रेडाई करणार न्यू इंडिया समिटच्या ६व्या संमेलनाचे ७ व ८ मार्च रोजी नाशिकमध्ये आयोजन

भारतातील वेगाने वाढ होत असलेल्या शहरांतील विकासाच्या संधी शोधणार

नाशिक: ‘’द कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई’’  न्यू इंडिया समिटच्या ६ व्या संमेलनाचे आयोजन करणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे ७ व ८ मार्च रोजी आयोजित होणारे हे संमेलन, “विकसित भारत-अनलॉकिंग पोटेंशियल ऑफ इमर्जिंग सिटीज’ या संकल्पेनवर आधारित आहे. हे संमेलन वेगाने वाढ होत असलेल्या भारतातील टियर २, ३ आणि ४ शहरांच्या विकासाला गती देण्याकरिता आवश्यक असलेल्या योजना शोधण्यासाठी व त्यावर चर्चा कारण्यासाठी महत्त्वाच्या धोरणकर्त्यांना एकत्र आणेल.

या संमेलनात नव्याने विकसित होत असलेल्या शहरांमधील विकासकामे करताना विकासकांना भेडसावणाऱ्या प्रमुख अडचणी आणि त्यांची संपूर्ण क्षमता उपयोगात आणण्यासाठी  करता येणाऱ्या ‘नाविन्यपूर्ण उपाययोजना’ यावर चर्चा केली जाईल. ४०० हून अधिक विकासक, धोरणकर्ते, उद्योग तज्ञ आणि विचारवंत यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. शाश्वत शहरी विकासासाठी आवश्यक असलेली धोरणे आणि रणनीती तयार करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे.या वर्षीच्या संमेलनात प्रतिष्ठित धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांचा सहभाग असणार आहे.

भारताच्या रिअल इस्टेट अर्थात स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या वाढी आणि परिवर्तनासाठी असलेली आपली वचनबद्धता या संमेलनाद्वारे क्रेडाई अधिक मजबूत करेल. यासाठी महत्त्वपूर्ण उद्योग उपक्रम आणि धोरणात्मक शिफारसी सादर केल्या जातील. तसेच, भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये नव्याने विकसित होणाऱ्या शहरांची भूमिका आणि “विकसित भारत’’ च्या परिपूर्तीसाठी त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात येईल.

‘’भारताची टियर २, ३ आणि ४ शहरे देशाच्या शहरी विकासाचा कणा बनत आहेत. पायाभूत सुविधेतील वाढती गुंतवणूक, सुधारित संपर्कव्यवस्था आणि स्थावर मालमत्तेची वाढती मागणी यामुळे ही शहरे आर्थिक विकास आणि शहरी नवसंशोधनासाठी केंद्रे बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत. क्रेडाई न्यू इंडिया समिट या शहरांतील विकासाच्या संधी उघडण्याच्या आमच्या प्रयत्नांचे द्योतक  आहे. या शहरांच्या विकासाला दिशा देणाऱ्या चर्चा, भागीदारी आणि धोरणात्मक उपायांवर या संमेलनात भर दिला जाईल. ‘नवीन भारत’घडवण्याच्या प्रक्रियेत आम्ही एकत्रितपणे कार्य करत असताना, हे संमेलन उद्योगातील अडचणी सोडवणे, नवकल्पना शोधणे आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल”, अशा भावना क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी व्यक्त केल्या.

क्रेडाई न्यू इंडिया संमेलन हे रियल  इस्टेट क्षेत्रातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, जो विकासक, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींमध्ये नवीन उपक्रम, संवाद आणि सहकार्य वाढविण्यासाठी एकत्रित आणतो. भारत अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, शहरी विकासाच्या भविष्याला आकार देण्यात हे संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल.

Sanket Navsalkar 

Mob:9403391859

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे