Breaking
ई-पेपरराजकियसामाजिक

लासलगावचा कचरा डेपोचा प्रश्न सुटणार ; लवकरच होणार शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून लासलगाव कचरा डेपोसह विविध विकासकामांची पाहणी

0 4 2 9 5 7

माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून लासलगाव कचरा डेपोसह विविध विकासकामांची पाहणी

लासलगाव, दि. २६ ऑक्टोबर :-

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव शिवनदी संवर्धन करण्यासाठी ११.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवडाभरात कार्यारंभ आदेश प्राप्त होऊन शिवनदी संवर्धनाच्या कामाला सुरुवात होणार असून लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज लासलगाव बाह्यवळण रस्ता, कचरा डेपो, पाटोदा रस्त्यावरील पूल या कामाची पाहणी केली. यावेळी लासलगाव कचरा डेपोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचा सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधिताना दिल्या.

यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप, संचालक डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, रूपा केदारे, पांडुरंग राऊत, शहराध्यक्ष बालेश जाधव, समाधान जेजुरकर, राजेंद्र चाफेकर, सोहेल मोमिन, माधव जगताप, ओम राऊत, अनिल विंचूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवनदी संवर्धन योजनेंतर्गत लासलगाव बंधारा ते पुढे ३ किलोमीटर अंतरावर नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी जॉगिंग ट्रॅक, स्वतंत्र मलजलवाहिनी, वृक्षारोपण, घाट बांधणी, कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया, परिसर सुशोभीकरण, पथदीप यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसापासूनचा लासलगाव कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार आहे. लासलगाव कचरा डेपो परिसरातील रस्त्याचे काम तातडीने करून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याच्या सूचना याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधिताना केल्या.

यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून सुरू असलेल्या लासलगाव बाह्यवळण रस्ता, शिवनदीवरील पूल या कामांची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली. या कामाला गती देऊन नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी संबंधिताना केल्या.

2/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे