
0
3
2
1
2
3
विंचूर दि.५ (प्रतिनिधी) येथील दत्तात्रय बारकू खाडे यांची विंचूर ग्रामपालिका पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य लिपिक पदी नियुक्ती करण्यात आली.पाणी पुरवठा विभागाचे मुख्य लिपिक दिनकर शेलार हे सेवा निवृत्त झाल्याने रिक्त जागेवर खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपालिकेच्या नुकत्याच झालेल्या मासिक मिटींग मध्ये खाडे यांना पदोन्नती देण्यात आली. खाडे यांच्या नियुक्ती बद्दल विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर उपसरपंच प्रविण चव्हाण, सदस्य मिराताई गोरे, वनिता गांगुर्डे, राजेंद्र मोरे, सुमनबाई दरेकर, प्रिती गायकवाड, दिलीप चव्हाण, शिरीन मोमीन, शोभा बोराडे, मंगला खैरे, पुजा जेऊघाले, नानासाहेब जेऊघाले, संतोष जाधव, सुवर्णा गोरे,निरज भट्टड आदींसह विंचूरकर ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
0
3
2
1
2
3