Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिक

बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

0 3 2 1 2 3

बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी…

नाशिकरोड :

        गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती ग्रंथालयात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी त्यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महाराजांच्या कार्याचा गौरव करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, समस्त भारतीयांचा मार्गदर्शक, कुशल नेतृत्व, प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी राजा असे श्री छत्रपती शिवाजी महाराज…त्यांच्या कुशाग्र बुद्धी चातुर्य, विविध नीती व कौशल्य, चरित्र याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व गुण आत्मसात करावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी संस्थेच्या १०७ व्या स्थापना दिवस निमित्ताने प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. के. सी.टकले , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, ग्रंथपाल एस. व्ही. चंद्रात्रे,विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. दीपक टोपे , एनसीसी अधिकारी डॉ.विजय सुकटे, प्रा. रोहित पगारे, विकास बगाव, कुलसचिव राजेश लोखंडे, संजय परमसागर,आकाश लव्हाळे, संग्राम जगताप, अनिल गोरे, आदित्य गायकवाड, अभिषेक धुळे, यश वरघडे, स्नेहा जगताप, जानवी थोरात, सरोज कांबळे, वैभव बरे, रोहित पिचड यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे