कृषीवार्तामहाराष्ट्रसामाजिक
नांदगाव, वैजापूर वन विभागाकडून बिबट्या जेरबंद

0
3
2
1
2
3
नांदगाव, दि.2 (मुक्ताराम बागुल):
नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक व वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी मंगळवारी झुंबरबाई माणिकराव पाटील (मांदडे) वृद्ध महिलेवर बिबट्याने डल्ला मारल्याने मृत्युमुखी पडल्या होत्या. शेतकरी व नागरिकांच्या मागणीवरून वैजापूर तालुक्यातील व नांदगाव तालुक्यातील वन विभागाने रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बुधवारी विशेष पथक परिश्रम घेऊन बिबट्यास जेरबंद केले. त्यामुळे बोलठाण व परिसरात नागरिकांचे मनातील भीतीचे वातावरण संपुष्टात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सोमवारी पहाटे पाच ते सहा वाजेच्या सुमारास प्रभाकर मांदडे यांची वृद्ध आई झुंबरबाई माणिक मांदडे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून प्राण घेतला. सदरची घटना नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक शिवारात प्रभाकर मांदडे यांच्या शेतात मळ्यामध्ये झुंबरबाई माणिक मांदडे या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून वैजापूर तालुक्यातील गिरी शिवारातील जवळच प्रभाकर मांदडे यांच्या शेतात फरपटत नेले होते. सदरची घटनेची नांदगाव तालुक्यातील बोलठाण पोलीस पोस्ट चे पोलीस हवालदार भास्कर बस्ते व पोलीस परमेश्वर श्रीखंडे व वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीसांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. वैजापूर तालुक्याचे आमदार बोरनार सर यांना देखील घटनेची माहिती मिळताच त्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. सदरचे प्रेत वैजापूर तालुक्यातील जिरी शिवारात पडलेले असल्याने शिरूर पोलिसांनी पंचनामा करून कारवाई केली.
बिबट्याला पकडण्यासाठी नांदगाव तालुक्यातील वनविभाग व वैजापूर तालुक्यातील व नांदगाव वन विभागाने जिरी शिवारात व शिवारातील शेतामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे ठेवले होते. नांदगाव तालुक्यातील व वैजापूर तालुक्यातील वन विभागाने सलग दोन रात्रंदिवस बिबट्याचा पाठलाग करून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी बुधवारी बिबट्याला जेर बंद केले. मात्र वैजापूर तालुक्यातील पोलीस व वन विभागाने पत्रकार यास धमकी देऊन व्हिडिओ व फोटो काढण्यास नकार दिला होता. त्यांनी काही नागरिकांना बिबट्याला पाहण्यासाठी अडविले व हाकलून दिले तर काही नागरिकांना त्यांनी परवानगी दिली त्यामुळे थोडे वातावरण तापले होते. परंतु प्रदीप संकपाळ सहाय्यक यांच्या मध्यस्थीने जास्त वाद झाला नाही.
0
3
2
1
2
3