Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक

*छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे स्वाभिमानी राजे*

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

0 3 2 1 2 3

*येवला शिवसृष्टीत मराठी चित्रपट मालिकेतील कलावंतांनी संगीतमय महानाट्यातून उलगडली शिवशौर्य गाथा*

*येवला शिवसृष्टीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन*

*येवला शिवसृष्टीत संगीतमय महानाट्याला शिवप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद*

*छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे स्वाभिमानी राजे- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

*छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर अन्यायाच्या विरोधात – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*नाशिक,येवला,दि.१९ फेब्रुवारी :-* छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट असून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध लढणारे स्वाभिमानी राजे होते. त्यांची लढाई कुठल्याही जातीधर्माच्या विरोधात नव्हे तर अन्यायाच्या विरोधात होती असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टी शिवशौर्य गाथा हे संगीतमय महानाट्य व नयनरम्य फायर शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,डॉ. शेफाली भुजबळ, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, राजेंद्र लोणारी,समाधान जेजुरकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,राजेश भांडगे, सुभाष पाटोळे, पप्पू सस्कर,गणेश शिंदे,समीर समदडीया,नानासाहेब लहरे, धनंजय कुलकर्णी,बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, मच्छिंद्र थोरात,मकरंद सोनवणे,दत्ता महाले, सचिन कळमकर,संजय पगार,भाऊसाहेब बोचरे, मलिक मेंबर,विजय जेजुरकर, देविदास निकम, संतोष खैरनार, सुनील पैठणकर,भूषण लाघवे, सुभाष गांगुर्डे, भगवान ठोंबरे, नितीन गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, सुमित थोरात, गोटू मांजरे, वाल्मीक कुमावत, विशाल परदेशी, संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने लढा देत जनतेवर अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवला. त्यांची युद्ध नीती ही जगात अभ्यासली गेली तिचा वापर आजही केला जातो. त्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्याना सोबत घेत स्वराज्य निर्माण केले. त्यांची लढाई ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर अन्यायाच्या विरोधात होती. शेतकऱ्यांना न्याय देणारे जगातील पहिले राजे होते. त्यांचे विचार त्यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे न्यायाला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित शिवप्रेमीना केले.

*या कलावंतांनी केले महानाट्याचे सादरीकरण…..*

या महानाट्याचे सादरीकरण मराठी चित्रपट मालिकेतील नामवंत मराठी कलाकार पंढरीनाथ कांबळे, प्रकाश भागवत, संदीप गायकवाड, अजय तपकिरे, चेतना भट, विश्वजित फड़के, राधा सागर, मयूरा पलांडे, गौरी देशपांडे, रवी कुलकर्णी, भैरव मिस्री यांनी केले. अतिशय भव्य दिव्य संगीतमय महानाट्यातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवशौर्य गाथा उलगडली गेली. यावेळी शिवप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही शिवशौर्य गाथा अनुभवताना शिवप्रेमी मंत्र मुग्ध झाल्याचे बघावयास मिळाले.

*शिवजयंती निमित्त शिवसृष्टीत आयोजित फायर शो मधून शिवप्रेमींनी अनुभवला नेत्रदीपक सोहळा*

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या औचित्य साधत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवप्रेमींसाठी विशेष फायर शो चे आयोजन केले होते. शिवसृष्टीत संगीतमय महानाट्याचे सादरीकरण झाल्यानंतर हा विशेष फायर शो पार पडला. यावेळी शिवप्रेमींनी नेत्रदीपक सोहळा अनुभवला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे