Breaking
आरोग्य व शिक्षणसामाजिक

आला पावसाळा, आरोग्य सांभाळा !

डॉ. राकेश पाटील (जनरल फिजिशियन, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,) नाशिक यांच्याकडून आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्वाचे सल्ले

0 4 2 9 5 7

पावसाळा म्हणजे हिरवळ, गारवा आणि निसर्गाचा आनंद घेण्याचा काळ, मात्र याच ऋतूमध्ये अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा” हा संदेश देत डॉ. राकेश पाटील (जनरल फिजिशियन, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक) यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळा – सौंदर्याच्या आडून आजारांची सावट

पावसाळ्याच्या सुरुवातीला वातावरणात उष्णता आणि आर्द्रता वाढल्याने श्वसनाचे विकार, सर्दी-खोकला, त्वचाविकार यांचा प्रकोप होतो. टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, कावीळ, अन्न विषबाधा आणि पोटाचे विकार यांचा धोका सर्व वयोगटांतील नागरिकांना असतो.

डॉ. पाटील यांचे पावसाळ्यातील आरोग्य सल्ले:

रस्त्यावरील खाद्यपदार्थ टाळा बाहेरचे, उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळा. हे बॅक्टेरियांनी दूषित होण्याची शक्यता अधिक असते. पोटदुखी, उलट्या-जुलाब यांचा धोका वाढतो. शक्यतो घरीच बनवलेले, स्वच्छ अन्न घ्या.उकळलेले पाणी प्या पावसाळ्यातील पाणीप्रदूषण टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे. प्रवास करताना स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा.
डासांपासून संरक्षण करा घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची लागण होऊ शकते. पाण्याची भांडी झाकून ठेवा. मच्छरदाणी, मॉस्किटो रिपेलंटचा वापर करा.

वैयक्तिक स्वच्छता पाळा

घरी आल्यावर हात धुणे, कपडे बदलणे, अँटीफंगल साबण आणि पावडर वापरणे आवश्यक आहे. गर्दीपासून शक्यतो लांब रहा.
अशोका मेडिकव्हर रुग्णालय – आधुनिक सेवा, काळजीपूर्वक उपचार
अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि स्वच्छता राखणारी यंत्रणा यामुळे रुग्णालयात पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांवर तत्काळ आणि प्रभावी उपचार उपलब्ध असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव, पण त्याचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये. पावसात भिजण्याचा आनंद जितकाच गोड, तितकीच सावधगिरी आवश्यक आहे.
“आरोग्य हाच खरा खजिना!”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे