Breaking
अपघात

एसटी व ट्रकचा भीषण अपघात दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

0 3 2 1 2 3

*एसटी व ट्रकचा भीषण अपघात*

दोन्ही चालक ठार; २ जण गंभीर जखमी

किरण घायदार, नाशिक । प्रतिनिधी 

येवला- मनमाड महामार्गावर अनकाई पाटी येथे ट्रक व एसटी बसचा समोरासमोर अपघात होऊन दोन्ही वाहनचालकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ प्रवाशी जखमी झाले आहेत यातील इंदूबाई निवृत्ती मोरे नाटेगाव ता कोपरगाव व शोभा गोपीनाथ कुमावत ब्राम्हणगाव ता कोपरगाव या २ महिला प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांना कोपरगाव व नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असण्याचा अंदाज आहे हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा पुढील भाग ड्रायव्हर केबिन पर्यंत पूर्णपणे दाबला गेला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड आगाराची मनमाडहुन शिर्डीकडे जाणारी बस क्रमांक एमएच- ०६ एस ८४२८ व येवल्याकडून मनमाडकडे जाणारी ट्रक क्रमांक एम एच २१ बी एच ४६६९ या दोन्ही वाहनात अनकाई येथे समोरासमोर भीषण अपघात झाला.

या अपघातात एसटी चालक भाऊसाहेब मोठाभाऊ गांगुर्डे व ट्रकचालक यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघातातील जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे