धार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नाशिकला होणारा कार्यक्रम रद्द करावा
अंनिसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
4
6
1
9
7
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नाशिकला होणारा कार्यक्रम रद्द करावा : अंनिसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
किरण कुमार आवारे….
नाशिक: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबा यांचा नाशिक येथे दिनांक ०२ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ते चमत्कार सदृश्य दावे करून,अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे तसेच महाराष्ट्रातील संत व महापुरुषाबद्दल वारंवार अपशब्द वापरत असतात म्हणून त्यांचा कार्यक्रम रद्द करावा, असे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, धीरेंद्र शास्री हे धार्मिक कथा प्रवचनाच्या नावाने महाराष्ट्रात येतात आणि येथील संत शिरोमणी संत तुकाराम तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरून त्यांचा वारंवार अपमान करतात. हा केवळ या महापुरुषांचा, संतांचाच अपमान नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेचा अपमान आहे.तसेच ते व्यक्तीच्या मनातील प्रश्न ओळखण्याचा आणि त्यांचे दैवी उत्तर देण्याचाही दावा करतात.
खरंतर अशा प्रकारचा चमत्कारिक दावा करणे हे भारतीय संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या मूल्यांशी पूर्णतः विसंगत आहे.
महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे.
त्याचे ते उल्लंघन करतात असे महाराष्ट्र अंनिसचे ठाम मत आहे.
त्यांचे हे दैवी चमत्कारिक दावे त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अटी- शर्ती,नियम पाळून कोणत्याही शासकीय इमारतीच्या खोलीमध्ये त्या विषयांचे तज्ज्ञ, शासकीय अधिकारी, पोलिस , पत्रकार आणि त्यांचे व संघटनेचे मोजके पदाधिकारी यांच्या समक्ष त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर ते सिद्ध करावेत. अंनिस ने दिलेल्या दहा व्यक्तींच्या मनातील प्रश्न ओळखावेत व त्यांचे नाव , गाव व पत्ता सांगावा.अशी सिद्धता त्यांनी करून दाखवली तर चमत्कार सिद्धीसाठी महाराष्ट्र अंनिसचे एकवीस लाखांचे पारितोषिक त्यांना मिळेल. अंनिस त्यांना हे जाहीर आव्हान देत आहे.
त्यांचे चमत्काराचे दावे ते सार्वजनिक ठिकाणी येऊन सिद्ध करण्याचा आग्रह धरतात. ही त्यांनी शोधलेली पळवाट आहे. शिवाय महाराष्ट्र अंनिस बद्दल लोकांमध्ये संभ्रम करण्याचा तो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे . म्हणून अशा अंधश्रद्धांना खतपाली घालणाऱ्या, भारतीय संविधानाच्या मूल्यांशी विसंगत वर्तन करणाऱ्या आणि महापुरुषांच्या आणि संतांच्या बद्दल अवमान कारक शब्द वापरणाऱ्या भोंदूबुवा धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम रद्द करावा व
सदर कार्यक्रम कार्यक्रम रद्द न झाल्यास अंनिस व समविचारी संघटना लोकशाही मार्गाने व शांतपणे आंदोलन करतील असे
निवेदनात पुढे म्हटले आहे. निवेदनावर अंनिस चे राज्य प्रधान सचिव डॉ टी आर गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे , बुवाबाजी संघर्ष विभागाचे महेंद्र दातरंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
(अधिक माहितीसाठी :
मो-9822630378)
0
4
6
1
9
7



