राजकिय
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंचूरला भाजपाची बैठक संपन्न
0
4
2
9
5
7
स्थानिकांना प्राधान्य द्या; बाहेरील उमेदवार नकोत ; भाजप कार्यकर्त्यांची मागणी
विंचूर….
येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विंचूर व परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची ठाम मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठींनी बाहेरून आणलेल्या उमेदवारांना उमेदवारी न देता, गावोगावी कार्यरत असलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे.
विंचूर येथील भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, यात कार्यकर्त्यांनी सांगितले की, “ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे. स्थानिक कार्यकर्ते जनतेच्या सुख-दुःखात सहभागी असतात, त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची खरी जाणीव असते. त्यामुळे त्यांच्यावरच जनतेचा विश्वास आहे.”
दरम्यान, विंचूर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला म्हणून घोषित झाले असून, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षणही सर्वसाधारण महिला वर्गासाठीच निघाले आहे. त्यामुळे या गटात बाहेरून येणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांनी बाहेरील उमेदवारांना विरोध करत, स्थानिक महिला कार्यकर्त्यांनाच संधी देण्याची मागणी अधिक ठामपणे मांडली आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “बाहेरून येणारे उमेदवार फक्त निवडणुकीच्या काळातच सक्रिय होतात. निवडणुकीनंतर त्यांचा जनतेशी संपर्क तुटतो. त्यामुळे पक्षाने स्थानिक महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांच्या भावना व जनतेचा विश्वास दोन्ही जपावेत.”
भाजप कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी लवकरच पक्षश्रेष्ठींना निवेदन सादर करण्याचे ठरवले असून, स्थानिक पातळीवर यास मोठा पाठिंबा मिळत आहे.
या घडामोडींमुळे विंचूर परिसरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, येत्या निवडणुकांमध्ये भाजपकडून कोणत्या स्थानिक महिला कार्यकर्त्याला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
यावेळी काकासाहेब दरेकर भाजपा निमंत्रित प्रदेश सदस्य, कैलास सोनवणे जेष्ठ भाजपा नेते, संपतराव नागरे भाजपा भटक्या विमुक्तीचे प्रदेश सरचिटणीस,संजय शेवाळे भाजपा माजी जिल्हा ओबीसी अध्यक्ष,निलेश सालकाडे भाजपा मंडळाध्यक्ष , धनंजय गांगुर्डे भाजपा विंचूर शहराध्यक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
……,………………….

0
4
2
9
5
7