0
4
2
9
5
7
विंचूर, दि. २९ (ऋषीकेश जोशी )
विंचूर व लासलगाव येथील ब्राह्मण समाजाच्या वतीने ऋषीपंचमी निमित्त आयोजित श्रावणी उपकर्म (ऋषीपूजन) हा उत्सव येथील श्रीराम मंदिरात उत्साहात पार पडला.
यज्ञोपवित(जाणवे) धारण करणा-या विप्रांसाठी सांगितलेल्या एका महत्त्वाच्या धार्मिक विधीमध्ये श्रावणी प्रयोगाला विशेष महत्व आहे. याला श्रावणी उपकर्म असेही म्हणतात. हा उत्सव आत्मनिरीक्षण, शुद्धीकरण आणि नवीन सुरुवात करण्याची संधी प्रदान करतो. आत्मशुद्धी, विधी नूतनीकरण आणि वेदारंभ यांचा यात समावेश असतो. या उत्सवात, यज्ञोपवीत बदलले जाते, पंचगव्य स्नान केले जाते, ऋषी-तर्पण आणि सप्त ऋषी पूजन केले जाते. भविष्यात चांगले कर्म करण्याची प्रतिज्ञा घेतली जाते.
ब्राह्मण भोजनाचे नियोजन अशोक अग्निहोत्री यांनी केले तर पौरोहित्य दिपक शास्त्री कुलकर्णी यांनी केले. या श्रावणी प्रयोगासाठी विंचूर आणि लासलगाव येथील विप्र बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
0
4
2
9
5
7



